पत्रकारांसाठी केंद्राची आरोग्य योजना,पाच लाखांपर्यंत मिळणार मदत
देशातील पत्रकारांसाठी केंद्राची एक योजनाय.2013 पासून ही सुरूय.पत्रकार वेलफेअर स्कीम असं या योजनेचं नाव.या योजनेत नुकतीच दुरूस्ती केली गेलीय.त्यात दोन गोष्टी प्रामुख्यानं नव्यानं समाविष्ट केल्या गेल्यात.पहिली म्हणजे एखादा पत्रकार आजारी पडला तर त्याला उपचारासाठी पाच लाखांपर्यंत मदत तर मिळणार आहेच ,एखादा पत्रकार अपंग झाला त्याच्याउपचारासाठीही मदत मिळणार आहे.शिवाय निधन झालेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांसाठी पाच लाख रूपये मिळणार आहेत.विशेष म्हणजे यासाठी राज्य किंवा केंद्र सरकारची अधिस्वीकृतीची गरज असणार नाही.फक्त 1955 च्या श्रमिक पत्रकार कायद्यानुसार जे पत्रकार आहेत अशा सर्वांना ही योजना लागू होईल.1955 च्या या कायद्यात ज्यांची उपजिविका पत्रकारितेवर अवलंबून आहे तो पत्रकार अशी सरळ,स्पष्ट व्याख्या केली गेलेलीय.याचा अर्थ उपसंपादक,मुक्त पत्रकार,वार्ताहर,प्रुफरिडर,फोटोजर्नालिस्ट,फोटोग्राफर,संपादक आणि इतरांना या योजनेचा लाभ मिळेल.आतापर्यंत ही योजना प्रिन्टवाल्यांसाठी होती ती आता इलेक्टॉनिक आणि वेब जर्नालिझम करणार्यांसाटीही लागू होणार आहे.अट फक्त संबंधित पत्रकार पाच वर्षे पत्रकारितेत असला पाहिजे.पत्रकारांकडून मदतीसाठी आलेल्या अर्जावर विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आलीय.ही समिती अर्जावर अंतिम निर्णय घेईल.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्या पत्रकारांनी आपला अर्ज महानिदेशक,( मिडिया एवं संचार ) प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो,ए विंग,शास्त्री भवन,नई दिल्ली 110001 या पत्त्यावर अर्ज करता येईल.तीन पानांच्या या अर्जाचा नमुना प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या pib.nic.in या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेता येईल.–