मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने 25 डिसेंबर रोजी नांदेड येथे तालुका अध्यक्षांचा भव्य मेळावा आयोजित केलेला आहे.या मेळाव्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मेळाव्याच्या निमित्तानं पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासाठी,पेन्शन आणि जाहिरात धोरण तसेच पत्रकारांच्या अन्य हक्कासाठीच्या लढयाचा सारा पट पत्रकारांसमोर उलगडून दाखविण्याची कल्पना आहे. 2005 ते 2016 या काळात मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभरात पत्रकारांची दोनशेवर आंदोलनं झाली आहेत. या आंदोलनातील छायाचित्रांचं एक प्रदर्शन नांदेड येथे भरविण्यात येणार आहे.त्यासाठी या सार्या लढ्यातील फोटोंची जमवा-जमव सुरू आहे.आपणास विनंती करण्यात येत आहे की,स्थानिक पातळीवर जी आंदोलनं झाली त्याचे फोटो क्लीप पाठविल्यास नांदेड येथील छायात्रित्र प्रदर्शनात त्याचा समावेश करता येईल.आपल्याकडे असलेली मोर्चाची,हल्ल्याची,आंदोलनाची छायाचित्रे आणि क्लीप्स उशिरात उशिरा 20 नोव्हेंबरपर्यंत परिषदेकडे पाठवाव्यात. फोटो शक्यतो इमेलवर पाठवावेत .इमेल खाली दिलेला आहे.नांदेडनंतर हे प्रदर्शन पुणे आणि मुंबईतही भरविले जाणार असून त्यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागात ते भरवून लोकांना पत्रकारांच्या प्रश्नाचे गाभीर्य समजून देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे.एक शॉर्ट फिल्म देखील करण्याची सूचना असून त्यावर देखील विचार सुरू आहे.आपण आपल्याकडील महत्वाचे फोटो पाठवून सहकार्य करावे ही विनंती.
एस.एम.देशमुख
e-mail- smdeshmukh13@gmail.com
phvksm@gmail.com