महाराष्ट्रातील पत्रकारांवरील हल्ल्याच्या


 2013 मधील प्रमुख घटनाः (६५) 


    11 महिन्यात महाराष्ट्रात 2 पत्रकारांचे खून,


    एका महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार,


     65 पत्रकारांवर जीवघेणे हल्ले,


     अनेकांवर खंडणी,ऍट्रॉसिटी,दरोड्‌याचे खोटे गुन्हे दाखल

——————————————————————-


  2 जानेवारी 13-   परभणी जिल्ह्यातील सेलू येथील पत्रकार दिलीप डासाळकर यांच्यावर हल्ला


 3 जानेवारी 13 –  बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील एका पत्रकाराला बातमी दिल्याब्ददल तहसिलदाराची ताकिद


 8 जानेवारी 13-  उस्मानाबाद येथील पत्रकार शिवप्रसाद बियाणी यांच्यावर पोलिसाचा हल्ला 


 9 जानेवारी 13-  आौरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे पत्रकार जमील पठाण यांना जिवे मारण्याची धमकी


 11 जानेवारी13 –  कन्नड तालुक्यीतील शिवणा-टाकळी प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या दोधांना डांबले


 13 जानेवारी 13  -उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोणचे पत्रार जगदीशचंद्र जोशी यांना गुंडांकडून मारहाण


 13 जानेवारी13-  नाशिक येथील एका हिंदी दैनिकाच्या पत्रकारास शिवसैनिकांकडून मारहाण


16जानेवारी 13 – पत्रकार हेमंत देसाई यांनी सकाळमध्ये लिहिलेल्या लेख प्रकरणी आर.एस.एसच्या धमक्या


16 जानेवारी 13-  पेण तालुक्यातील वडखळ येथील पत्रकार विजय मोकल यांना रवी पाटील यांच्याकडून धमक्या


8 फेब्रुवारी 13-     बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील पत्रकार बळीराम बाजीराव राऊत याच्यावर हल्ला.


10 फेब्रुवारी 13-    नांदेड येथील गावकरीच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला.


4 मार्च 13      –   सातारा येथील पत्रकार विशाल कदम यांना आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण


5 मार्च 13-     – सातारा येथे भोजपूरी चित्रपट कलावंतांची सहा पत्रकारांना मारहाण.कोंडून ठेवले


12 मार्च 13 –   पूर्णा येथील पत्रकार दि नेश चौधरीवर अ्रसिड हल्ला,हल्लेखोर कॉग्रेसचा पुढारी


 13 मार्च 13-   गंगाखेड येथील पत्रकार गंगाधर कांबळे यांच्यावर हल्ला


 14 मार्च 13 –    उमापूर येथील पत्रकार कृष्णा देशमुख यांच्यावर हल्ला


 19 मार्च 13-   नवी मुंबईत आसाराम बापूंच्या समर्थकांची पत्रकारांवर तुफान दगडफेक.सहा पत्रकार जखमी


 21 मार्च 13-     निखिल वागळे आणि राजीव खांडेकर यांच्यावर हक्कभंग ठराव दाखल


 27 मार्च 13-     टीव्ही-9चे छायाचित्रकार चरण मरगम यांना मुंबईत मारहाण


 28 मार्च 13-    सातारा येथील पत्रकार रोहित बुधकर यांच्यावर हल्ला


 29मार्च 13-   राणी सावरगाव येथील राहूल बनाटे आणि संजय राबोले यांच्याविरोधात खोटी तक्रार 


 30मार्च 13-   एबीव्हीपीच्या आंदोलनादरम्यान नागपूर विद्यापीठात कर्मचाऱ्यांची पत्रकारांना धक्काबुक्की


 31मार्च 13-    ताडकळस येथील पत्रकार त्र्यंबक खंदारे यांना संरपंचाची मारहाण


 1 एप्रिल 13 –   सातारा येथील पत्रकार पियूष भूतकर आणि महेश पवार यांना पोलिसांची दमदाटी


 2एप्रिल  13 –  वर्धा येथील पत्रकार रूपेश खैरी आणि प्रशांत वेलांडी याना पोलिसांकडून धमक्या


 2 एप्रिल 13-   मुंबई येथील प्रहारचे फोटोग्राफर विनम्र आचरेकर यांना सुरक्षा रक्षकांची मारहाण


 4 एप्रिल 13-   पारनेर येथील सकाळचे बातमीदार अनिल चौधरी यांच्यावर उपसंरपंचाकडून हल्ला.


 6एप्रिल  13-   न्यूज नेशनच्या सोनू कनोजिया आणि इम्रान या दोघांना निलंबित उपायुक्तांची मारहाण


 13 एपिॅल13-  बीड येथील पत्रकार सतीश शिंदे यांना शिरूर तालुक्यातील गोतळवाडा येथे मारहाण


 16एप्रिल 13-   नेवासा फाटा येथील पत्रकार बाळासाहेब देवखिडे यांना एपीआयकडून मारहाण


 25 एप्रिल 13-   विटा येथील पत्रकार विजय लोळे आणि सतीश भिंगे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल


  1 मे      13-      येथील पत्रकार सुधीर बिदू यांच्यावर हल्ला


 3 ंमे   13 –     झी न्यूजचे लातूर येथील प्रतिनिधी शशिकांत पाटील यांना राज

                          ठाकरे यांच्या अंगरक्षकाची धक्काबुक्की.ठाकरेकडूनही दम


 7 मे  13           गंगाखेड येथील पत्रकार संजीव सुपेकर यांच्यावर हल्ला.दोन्ही पाय फॅॅक्चर


 9 मे  13          सोनपेठ येथील पत्रकार सय्यद कादिर,भागवत पोपडे,कृष्णा पिंगळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल.


22जून  13      इचलकरंजी येथील ज्येष्ठ पत्रकार बाळ मकवाना यांच्या घरावर आवाडे कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांचा                        हल्ला. ब ातमीचा राग


 26 जून  13     माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील झुंजार नेताचे वार्ताहर अरविंद वाव्हळ यांच्यावर हल्ला.


 28 जून 13     आयबीएन- लोकमतचे औरंगाबाद ब्युरो चीफ सिध्दार्थ गोदाम आणि फोटोग्राफर सुधीर जाधव                           यांना धक्काबुक्की.


3 जुलै  13 –     नक्षर जिल्हयातील कर्जत येथील काही पत्रकारांना तेथील पी आय़ची बघून घेतो अशी धमकी.


 27 जुलै  13-     संगमनेर येथील युवा पत्रकार अंकुश बुब यांच्यावर जीवघेणा हल्ला.


 28 जुलै 13 –     पुर्णा येथील सांजवार्ताचे वार्ताहर अनिल अहिरे यांच्यावर अगोदरच्या ऍशिड

                           हल्ला प्रकरणातील गुंड अ़निल कुरकुरे याच्याकडून हल्ला.


 20 ऑगस्ट 13-   साधनाचे संपादक नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात गोळ्या छाडून हत्या.तीन महिन्यानंतरही                                    मारेकरी सापडलेच नाहीत.


 31 ऑगस्ट 13-    नगरचे आमदार अनिल राठोड यांच्या मुलाचा देशदूत कार्यालयासमोर धुडगूस.वीज बिल 

                               थकबाकीची बातमी दिल्याने राग.


 31 ऑगस्ट 13- मंगळवेढा तालुक्यातील दहिवड येथील पत्रकार प्रमोद बनसोडे यांना वाळू 

                           माफियाची त्यांच्या घरात घुसून मारहाण.शिविगाळ.


 4 सप्टेंबर   13-    आसाराम समर्थकांची पुण्यात टीव्ही-9 चे सचिन जाधव आणि छायाचित्रकार अभिजित पिसे                              यांना मारहाण


 4 सप्टेंबर   13     पर भणी येथील शेतकरी आंदोलनाचे चित्रिकरण करताना पीएसआय प्रकाश बांद्रे यांची                                       दिलीप बनकर यांना मारहाण


6 सप्टेंबर    13-   जयमहाराष्ट्र चे विलास बढे यांना एका पार्टीचे चित्रिकऱण करताना मारहाण.सुरक्षा रक्षकाचे कृत्य.


 16 सप्टेंबर 13-   गेवराई तालुक्यातील तलवडा येथील ओमप्रकाश सखाराम कांबिलकर यांना रेती 

                              तष्कराची मारहाण.ओमप्रकाश हिदू जागृतीचे वार्ताहर


 21 सप्टेंबर  13-    नेवासा येथील नवाकाळ,देशदूतचे वार्ताहर राजेंद्र वाघमारे यांना गोळ्या घालून ठार                                              मारण्याची धमकी.गुन्हा दाखल.


 1ऑक्टोबर 13-     जय महाराष्ट्र चॅनलचे विलास बढे यांच्यावर जातपंचायतीच्या लोकांचा हल्ला.बढे यांना दोन                                    तास घरात डांबले.


 1 ऑक्टोबर 13-    नक्षर जिल्हयातील श्रीगोंदा येथे पत्रकार धनंजय कानगुडे यांच्यावर हल्ला.धर्माची                                                चिकित्सा करणाऱ्या बातम्या छापल्या म्हणून हल्ला.


 2 ऑकटोबर 13-    मुख्यमंत्र्याच्या अंगरक्षकाकडून टीव्ही-9 चे रामराजे शिंदे आणि सागर कुळकर्णी यांना                                            मारहाण,धक्काबुक्की.


 5 ऑकटोबर 13-    आळंदी येथील पत्रकार विलास काटे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक पुढाऱ्याकडून 

                                 जीवे मारण्याच्या धमक्या. काटे सकाळचे वार्ताहर.


 7 ऑकटोबर 13 –  चंद्रपूर येथे पत्रकाराच्या विरोधात चौकाचौकात पोस्टरबाजी, पत्रकाराचा कुत्रे असा उल्लेख.


 8 ऑक्टोबर 13-    आदित्य पंचोलीची झी न्यूजच्या महिला पत्रकाराबरोबर असभ्य वर्तवणूक,कॅमेरॅची                                              मोडतोड.


22 ऑक्टोबर 13-    अहमदनगर येथील महान्यूजच्या कॅमेरामनला  कव्हरेज करतानाच मारहाण


 30 ऑक्टोबर 13-   यवतमाळ जिल्हयातील वणी येथील पुण्यनगरीच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा                                                 हल्ला.मोट्या प्रमाणात मोडतोड.


 9 नोव्हेंबर      13-    हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर चाकूहल्ला.वरती त्यांच्यावरच 

                                  खंडणी,ऍट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल.


 14 नोव्हेंबर    13-       चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील नरेश सोनार यांची गाडीतून बाहेर फेकून                                            हत्त्या.परप्रांतिय टोळीचे कृत्य.


 25 नोव्हेबर    13-     कंधार येथील लोकपत्रचे पत्रकार उत्तम चव्हाण यांना मनसे तालुका प्रमुखाकडून                                                धमक्या.पोलिसात तक्रार दाखल.


 30 नोव्हेबर   13       माजलगाव  येथील सुराज्यचे पत्रकार संतोष जेथलिया यांना धमक्या.नगराध्यक्षांच्य 

                                      विरोधात बातमी छापल्याने रागातून प्रकार.तक्रार दाखल.

———————————————————————————————————

 –

महाराष्ट्रातील पत्रकारांवरील हल्ल्याच्या

 2012मधील प्रमुख घटनाः (४५) 

महाराष्ट्रातील पत्रकारांवरील हल्ल्याच्या 2012मधील प्रमुख घटनाः
राज्यात या वर्षात एकूण 59 पत्रकारांवर हल्ले झाले. त्यातील प्रमुख 43
घटनेत ज्या 51 पत्रकारांवर हल्ले झाले त्याची माहिती येथे दिली आहे.ज्या
घटनांची नोंद पोलिसात झालेली नाही अशा काही 

—————————————————————————————————————————————————————————————–

आशिष धरत-उरण

1) दिनाक 1 जानेवारी- रायगड जिल्ह्यातील उरण येथील स्टार माझा चे पत्रकार आशिष धरत हे ओएनजीसी मध्ये लागलेल्या आगीचे चित्रिकरण करीत असताना तेथील सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीरपीएफच्या जवानांनी त्यांना धक्काबुक्की केली.अर्वाच्च शिविगाळ केली.कानशिलावर पिस्तूल ठेऊन जिवे मारण्याची धमकी दिली.पत्रकारांनी उरण पोलिसात तक्रार दिली.कारवाई काहीच झाली नाही.

लोकमत ,जळगाव

2)दिनांक 17 जानेवारी ः जळगाव येथील लोकमतच्या कार्यालयावर समाजकंटकांचा हल्ला.एका घटस्फोटीत महिलेला तिच्या आईऩेच वेश्या व्यवसायाला लावले.अशा आशयाचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते.त्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचे सांगितले गेले.पोलिसांत तक्रार दिली.कारवाई शून्य.

महाराष्ट्र टाइम्स ,मुंबई

3) दिनांक 27 जानेवारीः मकाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई येथील कार्यालयावर शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.आनंदराव अडसूळ राष्ट्रवादीत जाणार अशी बातमी प्रश्नार्थक चिन्ह टाकून मटाने छापली होती.बातमी तथ्यहिन असल्याचे कारण सांगत हा हल्ला झाल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे होते.हल्लेखोरांना अटक झाली पण मुख्य चिथावणीखोरांपर्यत पोलिस पोहचू शकली नाही.

प्रवीण गोरेगावकर, गोरेगाव -रायगड

4) दिनांक 25जानेवारीःरायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील पत्रकार प्रवीण गोरेगावकर यांना बेदम मारहाण केली गेली.त्यांनी एक व्यगात्मक लेख कोकणातील एका दैनिकात लिहिला होता.तो आपल्यालाच उद्‌ेशून लिहिल्याच्या समजातून त्यांच्यावर हल्ला झाला.गोरेगावकर हे अपंग आहेत.हल्लेखोर त्यांना मारहाण करीत असताना लंगड्या तुला बघून घेऊ अशा धमक्या देत होते.पोलिसात तक्रार.कारवाई नाही.

दोन पत्रकार, पुणे

5) दिनांक 30 जानेवारी ःपुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी संभाजी पुलावर वाहतूक नियम मोडीत पोलिसांवर हल्ला केला.त्याचे चित्रांकण करणाऱ्या पत्रकाराांवरही लष्करातील हे भावी इंजिनिअर तुटून पडले.पोलिसात तक्रार दाखल पण कारवाई नाही

विशालसिंग करकोटक,औरंगाबाद

6) दिनांक 11 फेबु्रवारी ः औरंगाबाद येथील इंडिया टीव्हीचे पत्रकार विशालसिंग करकोटक यांना पैठण येथील रेती माफियांनी जिवे मारण्याची धमकी दिली. वाहिनीवर बातमी दाखविल्याच्या रागातून ही धमकी दिली.आौरंगाबादच्या पत्रकारांनी दबाव आणल्यानंतर गुन्हा दाखल.

हर्षद कशाळकर,िअ़लबाग

7) दिनांक 15फेब्रुवारीः जिल्हा परिषदेच्या मतदानाच्या वेळेस आमदार जयंत पाटील पोलिसांच्या अंगावर झावून गेले.त्याचे चित्रिकऱण करणाऱ्या इटीव्हीचे हर्षद कशाळकर आणि आयबीएन-लोकमतचे मोहन जाधव यांना जयंत पाटलांची दमदाटी.पाहून घेतोची धमकी.पोलिसात तक्रार नाही

करण नवले,श्रीरामपूर

8) दिनाक 17 फेब्रुवारीः नक्षर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील गावकरीचे उपसंपादक करण नवले यांना पोलिसांनी जिल्हा परिषद निवडणूक मतदानाच्या वेळेस लाथा-बुक्यांनी मारहाण केली.या घटनेच्या विरोधात पत्रकारांनी आंदोलन केल्यानंतर दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.तिधे निलंबित केले.पोलिसांवर गुन्हेही दाखल केले गेले.

सुरेश पाटील ,उदगीर

9) दिनांक 21 फेब्रुवारीः इा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील ज्येष्ट पत्रकार सुरेश पाटील यांच्या डोळ्यात तिखटाची पूड टाकून त्यांचे अपहरण केले गेले.त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करू न त्यांना गावाबाहेर सोडले गेले.आरोपींमध्ये एक महिला होती.सुरेश पाटील जखमी अवस्थेत पोलिसात जाण्यापूर्वीच संबंधित महिला पोलिस ठाण्यात गेली.तिच्या तक्रारी वरून सुरेश पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.सुरेश पाटील यांची तक्रार दाखल करून घ्यायलाही पोलिसांचा नकार

अनिल कसबे ,नांदेड

10)दिनांक 24 फेब्रुवारी ः नांदेड येथील देशोन्नतीचे पत्रकार अनिल कसबे यांना शिवसेनेच्या खासदारांनी जिवे मारण्याची मोबाईलवरून धमकी.देशोन्नतीचे कार्यालय जाळण्याचीही धमकी.पोलिसांचा पत्रकारांशी असहकार.गृह मंत्र्यांनी बोलल्लयानंतर तक्रार दाखल पण नंतर प्रकरण दडपण आणून मिटविले गेले.

तीन पत्रकार,कर्जत (जिल्हा नगर)

11)दिनांक 26 फेब्रुवारीःनगर जिल्ह्यातील कर्जत येथील तीन पत्रकारांना वाळु माफियाकडून बेदम मारहाण.

पनवेल

12)दिनांक 27 फेब्रुवारी ःपनवेलनगरपालिकेच्या सभेतून स्थानिक पत्रकारांना अपमानास्पदरित्या बाहेर काढले गेलेेेे.पालिकेच्या सभेला पत्रकारांना बोलावण्याची पंरपरा असताना अशी घटना पालिकेच्या इतिहासात प्रथमच घडली.पनवेल पालिेकेत कॉग्रेसची सत्ता आहे.

राजेश टोळये,सोलापूर

13) दिनांक 28 फेब्रुवारीःसोलापूर येथील दैनिक सुराज्यच्या अंकात बळी तो कान पिळी या मथळ्याखाली एक लेख प्रसिध्द झाला होता.या लेखामुळं पोलिसांची बदनामी झाल्याचे कारण सांगत पोलिसांना संपादक राजेश टोळये यांच्यावर गुन्हा दाखल केला.कार्यालयात घुसून त्यांना अटक केली.रात्रभर त्यांना पोलिस कोठडीत डांबून ठेवण्यात आले.दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयात हजर केले गेले.तेथे त्यांना आठ दिवसाची पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.पोलिसाच्या दाव्य़ात त़थ्य नसल्याने न्यायालयाने त्यांची मागणी धुडकावून लावत टोळे यांना जामिन मंजूर केला.टोळे यांना पोलिस कोठडीत ठेऊन अद्दल घडविण्याच ी पोलिसांची योजना होती.

शैलेश पालकर , पोलादपूर

14) दिनांक 1मार्चः आयगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील पत्रकार शैलेश पालकर यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हल्ला.गंभीर दुखापत झाली.पालकर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता तेच आरोपी आहेत अशा पध्दतीने त्यांनाच पोलिस ठाण्यात दिवसभर बसवून ठेवले.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला पण त्याला अटक झाली नाही.

तिरूपती चितियाला,गडचिरोली

15) दिनांक 6 मार्चः गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंजा तालुक्यात टेकाळा ताला या परिक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर कॉपी सुरू होती.सिरोंजा येथील सकाळचे पत्रकार तिरूपती चितियाला हे फोटो काढण्यास गेले असता एका पोलिस उपनिरिक्षकाने त्यांच्यावर हल्ला केला.त्याच्याविरोधात कोणतीच कारवाई नाही.आर.आर.पाटील हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत.

ठाणे

16)दिनांक 7मार्च ः ठाणे मनपात महपोर -उपमहापोर यांच्या निवडणुकीच्या वेळेस आयुक्त आर .ए.राजू यांनी पत्रकारांना प्रवेश नाकारला.पत्रकारांशी हुज्जत घातली.त्याच्य्‌ ा निशेधार्थ पत्रकारांची आंदोलन केलं.पत्रकारांच्या अवमान प्रकरणाचा युतीने निषेध केला.

सातारा

17) दिनांक 11 मार्चः पतंगराव कदम यांच्या पत्रकार परिषदेत लोकमतचे पत्रकार मोहन म्हसकर आणि स्टार माझाचे राहूल तपासे या पत्रकारांनी पतंगराव अडचणीत येतील असे काही प्रश्न विचारले.त्यावरून पतंगराव भडकले आणि तू कोणत्या पेपरचा आहेस,तुझ्या मालकाला बोलतो,तुझा हिशोब करतो,तुझी नोकरी घालवितो असा दम देत पत्रकारांचा अवमान केला.पत्रकारंाशी एका मंत्र्याने केलेल्या या वर्तनाचा पत्रकारांनी निषेध केला.कदमांवर कायदेशीर कारवाई होण्याचा प्रश्नच नव्हता.

राजकुमार भगतचिरणेर, उरण

18) दिनांक 12 मार्चः उरण येथील सकाळचे बातमीदार राजकुमार भगत यांना ऱाऊत नावाच्या इस्टेट एजंटने मारहाण केली.त्या विरोधात पोलिसांत तक्रार.उरण पोलिसात गुन्हा दाखल.

सतीश मोहिते ,नांदेड

19) दिनाकं 19ः नांदड येथील सिडको भागातले डॉ.सूर्यकांत पठ्‌ठेवाड यांच्या चुकीच्या उपचारामुळे एका छोट्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी पत्रकार सतीश मोहिते यांनी स्थानिक चॅनेलवरून दिल्याने पठ्ठेवाड य़ांनी पोलिसात तक्रार.पोलिसांनी मोहिते यांच्यावर विविध गुन्हे दाखल करून त्यंाना त्रास दिला.

बळवंत ढगे ,वर्धा

20) दिनांक 23 मार्च ः क वर्धा येथील पत्रकार बळवंत ढगे यांनी तेथील शिक्षण संस्थेच्या संदर्भात काही माहिती मागितली असता संस्था चालक राजेंद्र शर्मा यांनी ढगे यांना मारहाण केली.या संबंधात ढगे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

राकेश कुटे, पुणे

21) दिनांक 31 मार्च ः णे पुण़े येथील केळकर रस्त्यावर दोन तरूण अन्य एका तरूणाला मारहाण करीत असल्याचे पाहिल्यानंतर सकाळचे छायाचित्रकार राकेश कुंटे यांनी पह्ल्यिानंतर त्यानी मारहाणीची दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात टिपायला सुरूवात केली.ते पाहून संतापलेलया अजय खेडकर आणि कबीर मारवाडी यांनी कुंटे यांना मारहाण केली.त्यांच्या कॅमेऱ्याची मोडतोड केली.आणि ते पसार झाले.गुन्हा दाखल.

आनंद शर्मा,मंबई

22)दिनाक 12 एप्रिल ः म मुंबई येथील दादर भागात एक अनाधिकृत होॅटेल चालविले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नवभारतचे पत्रकार आनंद मिश्रा याच्यावर हॉटेल मालकाकडून निघृण हल्ला झाला.त्यात मिश्र गंभीर जखमी झाले.दुसऱ्या दिवशी ़आऱ.आर.पाटील यांनी दादर भागाला भेट देऊन अनाधिकृत बांधकामे हटविली.

दीपक बारकुल,येरमाळा-उस्मानाबाद

23) दिनांक 23 एप्रिल ः उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथील लोकमतचे पत्रकार दीपक बारकुल यांना एका हॉटेल व्यावसायिकाक डून मारहाण.आरोपीचे नाव अनिल माधवराव बारकुल असे आहे.पत्रकाराने हॉटेलचे फोटो काढल्याच्या रागातून ही घटना घडली.आरोपीवर कारवाई नाही.

शिवपूर -खेड

24) दिनांक 30 एप्रिलः़खेड येथील एका टोलनाक्याची मोडतोड आमदार संजय पाटील यांचे समर्थख करीत होते.त्याचे छायांकन करणाऱ्या आयबीएन लोकमत वाहिनीच्या पत्रकारास मारहाण.आरोपीवर कोणतीच कारवाई नाही.

चाणक्य,बीड

25) दिनांक 2 मे ः ब बीड येथील चाणक्य दैनिकाचे संपादकांवर धार्मिक भावना भडकविल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.एका वेबसाईटवर हिंदु देव-देवतांची बदनामी होईल अशी छायाचित्रं होती.ती वेबसाईट बंद करावी अशी मागणी एका नागरिकाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली होती.त्यासंबंधिची बातमी चाणक्यने छापल्याने वेबसाईटवर कोणताही गुन्हा न दाखल करता पोलिसांनी चा़णक्यच्या ंसपादाकांवरच गुन्हा दाखल केला.

चेतम भैराम, भंडारा

26) दिनांक 3 मेः भंडारा येथील दैनिक देशोन्नतीचे पत्रकार चेतन भैराम यांना शिक्षण सम्राटाकडून जिवे मारण्याच्या धमक्या.शिक्षण संस्थेतील गैरकारभाराच्या विरोधात भैराम यांनी लेख माला लिहिली होती.त्यामुळे संतापलेल्या शिक्षण सम्रटाने हा प्रकार केला.

राजू भगत ,उरण जिल्हा रायगड

27) दिनांक 20 मेः उऱण तालुक्यातील चिरणेर येथील पत्रकार राजू भगत यांच्यावर शेकापच्या गुडंाचा प्राणघातक हल्ला.शेकापच्या विरोधात बातम्या दिल्याच्या कारणावरून हा हल्ला झाला.पोलिसांत तक्रार.

अच्छाड

28) दिनांक 22 मे ः गुजरातच्या सीमेवर असलेल्या अच्छाड येथील सीमा तपासणी नाक्यावर भ्रष्टाचाराचे बिंग फोडण्यासाठी गेलेल्या सकाळच्या प्रतिनिधीला एस.सी.शुक्ला या आरटीओ इन्स्पेक्टरने गाडीत डांबून ठेवले.धक्काबुक्की केली.जीवे मारण्याची धमकीही दिली.

प्रवीण गायकवाड.जऴगाव

29)दिनांक 27 मेः जळगाव येथे कोळी समाजाच्या आंदोलनाचे चित्रिकरण कऱणाऱ्या भास्करचे प्रतिनिधी प्रवीण गायकवाड आणि दिव्य मराठीचे आबा मकासरे यांना मारहाण.कॅमेऱा तोडण्याचे प्रयत्न.तक्रार दाखल

अनिल महाजन,पाचोरा

30) दिनांक 11 जूनः छाचोरा येथील पत्रकार अनिल बाबूलाल महाजन यांनी वाळू ठेकेदाराच्या विरोधात बातम्या दिल्याने संबंधित ठेकेदाराचा वाळू ठेका रद्द झाला.त्यामुळे संतापलल्या रेती माफियाचा महाजन यांच्यावर हल्ला .महाजन गंभीर जखमी.

अस्लम पोपटे वाशिम

31) दिनांक 15 जून ः ऊा वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील लोकमत समाचारचे पत्रकार अस्लम पोपटे यांच्यावर पोलिस कॉन्स्टेबल तायडे यांनी हल्ला केला.पोपटच्या कानाला चावा घेतला.उलट पोपटवर गुन्हा दाखल केला.रस्त्यात गाडी उभी केल्याच्या कारणावरू न ही मारहाण झाली.

धनंजय पार्टे,माणगाव जिल्हा रायग़ड

32) दिनांक 25 जून ः रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील लोकमतचे पत्रकार धनंजय पार्टे यांच्यावर खुनी हल्ला.शेकापचे पाच-पन्नास कार्यकर्तेपार्टे याच्या कार्यालयात घुसले त्यांना मारहाण केली.या जमावात काही महिला होत्या.महिलांनी पार्टे यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली.अंजली पवार यांनी ही तक्रार दिली.जिल्हा पऱिषदेचे सदस्य ज्ञानदेव पवार यांच्या विरोधात पार्टे यांनी तक्रार दाखल केली.गुन्हा दाखल झाला पण पवार यांना अटक नाही.बामणोली येथील शाळेचे बांधकाम केवळ 25 टकक्के पूर्ण झालेले असताना ते शंभर टक्के झाल्याचे दाखवून त्याचे बिल उालले गेले.याची माहिती पार्टे यांनी माहितीच्या अधिकारात काढून त्याची बातमी छापली होती.त्या रागातून हा हल्ला झाला.पार्टे यांच्यावर अलिबागच्या रूग्णालयात उपचार

कऱण्यात आले.

जीवन केणी,उरण

33) दिनांक 1जुलैः उरण येथील पत्रकार जीवऩ केणी यांच्यावर शेकापच्या गुंडाकडून हल्ला.बातमी देतोस काय म्हणत हा हल्ला झाला.जीवन गावंड,सुरेश राऊत,सुरेश पाटील यांनी हा हल्ला केल्याची तक्रार पोलिसात दाखल

चार छायाचित्रकार, मुंबई

34) दिनांक 12 ऑगस्टः ट्टयानमार आणि आसाममधील घटनांच्या निषेधार्थ रझा अकादमीच्यावतीनं मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळेस काही समाजकंटकांनी एबीपी माझा,न्यूज 24 तासआणि टीव्ही-9च्या तीन ओबी व्हॅन जाळल्या.तसेच छायाचित्रकारांवर हल्ले केले गेले.त्यात टाइम्सचे श्रीराम वेर्णेकर,द हिंदूचे विवेक बेंद्रे,मीड-डेचे अतूल कांबळे सकाळ टाइम्सचे प्रसांत सावंत जखमी झाले.माध्यमांचं कोट्‌यवधींचं नुकसान झालं.कारवाईच्या नावानं बोंब

मधुकर ठाकूर,उरण जिल्हा रायगड

35) दिनांक 23 सप्टेंबर ः उऱण येथील पत्रकार मधुकर ठाकूर यांना घारापुरी येथील गुंडांकडून मारहाण.वृत्तसंकलनासाठी जाताना मोटार साईकल अडवून ही मारहाण झाली.उरण ठाण्यात तक्रार दाखल

अरविंद जाधव,उदगीर

्र36)दिनांक 24 सप्टेंबर ःउदगीर येथील पत्रकार अऱविंद जाधव यांनी पोलिसांच्या विरोधात बातम्या छापल्या म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱणयात आला.त्यानंतर त्यांना कोठडीत डांबण्यात आले.पत्रकारांतर्फे निषेध.

संजय मालानी,बीड

37)दिनांक 25सप्टेंबरः बीड येथील सुराज्य दैनिकाचे वृत्तसंपादक संजय मालानी यांच्यावर प्राणघातक हल्ला.हल्लेखोर तोंडाला काळे रूमाल बांधून आले होते.मालानी यांचा ओढ फुटला.पोय मोडला…27 टाके पडले.पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली.ते महिना भर तुरूंगात होते.एस.एम,देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे पत्रकारांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.

भंडारा

38) दिनांक 28 सप्टेंबर ःदेशोन्नतीच्या भंडारा येथील कार्यालयावर समाजकंटकांचा हल्ला.दसऱ्याच्या मिरवणुकीच्या संदर्भात दिलेल्या बातमीच्या कारणावरून हा हल्ला झाला.पोलिसांची भूमिका बघ्याची.पोलिसांनी दिली पत्रकाराला आत घालण्याची धमकी

संतोष जाधव ,वर्धन जिल्हा रायगड

39) दिनांक 29 सप्टेंबर ः आयगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील पत्रकार संतोष जाधव यांच्यावर पोलिसांसमोरच गुंडांचा हल्ला.वरती जाधव यांच्यावरच गुन्हा दाखल.जिल्हा पत्रकार संघाने घेतली एसपींची भेट.

ग़डचिरोली

40)दिनांक 8 ऑक्टोबर ः भचजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पत्रकार पैसे घेऊन बातम्या देतात असा आरोप केला.पत्रकार संघाने यााचा निषेध करीत गडकरीच्या राजीनाम्याची मागणी केली.

नाशिरखान,नसिम शेख.बुलढाणा

41) दिनांक 11 ऑक्टोबरः बथलढाणा येथील पत्रकार नासिरखान आणि नसिम शेख यांच्यावर निलंबित पोलिस शिपाई शशी पवार आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला.पवार असे नाव दिसेल अशी फॅन्सी नेम प्लेट असलेल्या ऍक्टिव्हावरून दोन महिला पोलिस जात असताना त्याचे छायाचित्र पाठीमागुन कोणी तरी काढले आणि ते फेसबुकवर अपडेट केले.हे नासिरशेख आणि नसिम खानचे काम असल्याच्या संशयावरून ही मारहाण झाली.पोलिसात तक्रार झाली पण आरोपी शशी पवार पोलिस ठाण्यातून फरार झाला.

विवेक केरूरकर,देगलूर

42)दिनांक 26 ऑक्टोबरः देगलूर येथील पत्रकार विवेक क ेरूरकर यांनी दसरा मिरवणुकीच्या संदर्भात दिलेल्या बातम्यांवरू त्यांच्या कार्यालयास आग लावण्यात आली.दसरा मिरवणुकीच्या वेळेस देगलूरला दंगल झाली होती त्याच्या बातम्या दिल्याच्या कारणावरून हा हल्ला झाला.केरूरकर यांचे मोठे नुकसान झाले.

पी.रामदास,मुंबई

43) दिनांक 31 ऑक्टोबरः टी व्ही-9चे रिपोर्टर पी.रामदास आणि कॅमेरामन सचिन चिंदरकर हे कलर्स वाहिनीच्या कार्यालयासमोर आऱपीआयचे आंदोलन कव्हर करीत असतानाच दगडफेक सुरू झाली तिाा कटा पी रामदास यांनी आखल्याचा आरोपावरून टीव्ही-9च्या दोन पत्रकारांच्या विरोधात भादंवि 120 बी अंतर्गत कारवाई.गुन्हा दाखल.गुन्हा मागे घेण्याचे गृहमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरीही तशी कारवाई नाही.

पत्रकारांवरील हल्ल्याच्या संदर्भातली वरील सारी माहिती वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या किंवा जिल्हा पत्रकार संघांकडून उपलब्ध माहितीच्या आधारे जमा केली गेलेली आहे.मला पूर्ण कल्पना आहे की,ही माहिती परिपूर्ण नाही राज्यात पत्रकारांवर यापेक्षा जास्त हल्ले झालेले आहेत .वरील घटनांखेरीज पत्रकारांवरील हल्लयाच्या अन्य काही घटनांची माहिती आपणाकडे असेल किंवा आपण स्वतःशिकार झाला असाल तर अशी माहिती कृपया मला फोनवर किंवा इमेलवर कळवावी. पत्रकार संऱक्षण कायदा कऱण्याच्यादृष्टीने ही माहिती अत्यंत महत्वाची ठरणार आहे.अशी कोणतीही माहिती सरकारी यंत्रणेकडे नाही ही माहिती केवळ आपल्याकडंच आहे.

माहिती देण्यासाठी माझा मोबाईल क्रमांक 9423377700असा आहे.

– 1

एस.एम.देशमुख,

निमंत्रक

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती

(माझ्या ब्लॉगवरील पत्रकार हल्ल्याच्या संदर्भातली माहिती अन्यत्र वापरताना एस.एम.देशमुख यांच्या ब्लॉगवरून असा उल्लेख करणे कॉपी राईट कायद्यान्वये अनिवार्य आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here