जगभरात पत्रकारांवरील हल्ल्लयाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालेली आहे.खालील आकडेवारी व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारी आहे.
2014मध्ये जगभरात 46 पत्रकारांना ठार करण्यात आलं,
यातल्या बारा जणांच्या मृत्यूचं गुढ अजून उकललेले नाही
मिडियातील 8 सहाय्यकांचाही मृत्यू
आखाती देशात सर्वाधिक पत्रकारांचा मृत्यू
याशिवाय अनेक पत्रकार बेपत्ता
जगभरात आजपर्यत मारले गेलेले पत्रकार
—————————-
इराक-151
फिलिपिन्स 59
सोमालिया-42
रशिया -17
श्रीलंका -16
सिरिया- 67
पाकिस्तान-45
मेक्सिको -22
ब्राझील – 16
श्रीलंका -15
महाराष्ट (भारत) -19
————————————————
महाराष्ट्रात गेल्या आठ महिन्यात 2 पत्रकारांचे खून झाले,दैनिकांच्या 5 कार्यालयांवर हल्ले केले गेले,39 पत्रकारांवर हल्ले झाले.आरोपी मोकाट सुटले आहेत कारण पत्रकारांना कायदेशीर संरक्षण नाही.म्हणूनच आम्ही पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मागतो आहोत.पत्रकारांवरील हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा असला पाहिजे आणि पत्रकारांवरील हल्ल्याच्या केसेस फास्ट टॅ्रक कोर्टामार्फत चालविल्या पाहिजेत.
त्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने तेरा वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.आमरण उपोषण केले,मोर्चे काढले,लॉंगमार्च काढले,निदर्शने केली,घेराव घातले,पण प्रत्येक वेळी खोटी आश्वासनं दिली गेली.सरकार काही करीत नाही म्हणून पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत.दर पाच -सहा दिवसाला महाराष्ट्रात एक पत्रकार बदडला जात आहे.