महाराष्ट्रातील पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांचा मुद्दा काल विधानसभा आणि विधानपरिषदेत उपस्थित झाला.विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे आणि अन्य सहा सदस्यांनी तारांकित प्रश्नाव्दारे पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याबाबत सरकारला जाब विचारला . त्यावर लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “पत्रकारांना दमदाटी,शिविगाळ आणि मारहाण प्रकऱणी नऊ दखलपात्र आणि दोन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आल्याची”माहिती दिली.नऊ पैकी सात प्रकरणात आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याचेही त्यानी सांगितले.प्रहारचे राजकीय पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांना आलेल्या धमक्या विचारात घेऊन त्याना संरक्षण देण्याबाबत मुंबई पोलिसांकडून आढावा घेतला जात असल्याचे मुख्यमंत्र्यानी आपल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.
– विधानसभेत नितेश राणे यांनी औचित्याच्या मुद्या या माध्यमातून पत्रकारांवरील हल्ल्याचा प्रश्न उपस्थित करून राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करावा आणि पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करावी अशा मागणी केली .सिंधुदुर्गमधील पत्रकारांनी या मागणीसाठी नुकतेच उपोषण केले.त्याचा उल्लेख करून राणे यांनी पत्रकाराना समाजविधातक शक्ती पासून धोका असून त्यांना कायदेशीर संरक्षण मिळाले पाहिजे असा आग्रह धरला. मिळणारे तुटपुंजे वेतन लक्षात घेऊन त्यांना पेन्शन योजनाही सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी सरकारने लक्ष घालून पत्रकारांच्या मागण्या तातडीने ंमंजूर कराव्यात अशी मागणीही राणे यांनी केली आहे.दोन्हीकडे हा प्रश्न उपस्थित सरकारचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधणार्या विरोधी पक्ष आमदारांचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.-