पत्रकारांनी राबवली स्वच्छता मोहिम*

0
845

*सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पत्रकारांनी राबवली स्वच्छता मोहिम*

*मणदूर येथील हुतात्मा संकुलाची केली स्वच्छता*

समाजाचा जागल्या म्हणून पत्रकार लोकांना न्याय मिळवून देण्याचा तर काम करीत असतातच पण त्याच बरोबर सामाजिक कार्यातही पत्रकार आघाडीवर असतात हे विविध भागातील पत्रकार दाखवून देत असतात.सांगली जिल्हयातील शिराळा येथील पत्रकारांनी हुतात्मा परिसराची स्वच्छता केली.

गत महिन्यात सोनवडे येथे शिराळा तालुक्यातील पत्रकारांची कार्यशाळेेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करणेसाठी मराठी पत्रकार परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि पत्रकार अधिस्वीकृति समितीचे सदस्य शिवराज काटकर हे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांना योग्य मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी प्रत्येक महिन्यात एक सामाजीक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. शिराळा ही भूमिगत क्रान्तिकारकांची भूमि इथला जंगल सत्याग्रह ब्रिटिश संसदेत गाजल होता. महात्माजिनी त्याची दखल घेतली होती . त्यामुळे इथल्या तालुक्यातील सर्व हुतात्मा संकुल यांची स्वच्छता करण्याचा निर्णय झाला. शिराळा तालुक्यात चार हुतात्मा स्मारके आहेत. सध्या हुतात्मा केंद्रांची अवस्था अतिशय बिकट आहे. काही हुतात्मा केंद्रे शेवटच्या घटका मोजत आहेत. त्या ठिकाणी दारूड्यांचे अड्डे तर प्रेम विरांनी त्यांच्या प्रेमाची भावना तेथील भिंतीवर लिहून जाहिर केले आहे. ज्या हुतात्म्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या छातीवर ब्रिटीशांच्या गोळ्या झेलल्या. ज्यानी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी रक्ताचे पाट वाहिले. आपल्या संसाराचा, मुलांचा विचार केला नाही. अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींची आठवण आपल्या पुढच्या पिढीला व्हावी म्हणून हुतात्मा संकुलांची उभारणी ठिकठिकाणी शासनाने केली. परंतु त्याची देखभाल करण्यास शासन पूर्णपणे विसरले असे म्हणावे लागेल. सध्या या हुतात्मा संकुलनांची अवस्था पाहता शासनाने या हुतात्म्यांची एक प्रकारे अवहेलनाच चालवली आहे का? असा प्रश्न पडलेल्या शिवाय राहत नाही.
या हुतात्मा संकुलनांच्या दुराव स्थांच्या बातम्या कित्येक दैनिकांमधून प्रसिध्द झाल्यात परंतु याबाबत सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे.
हाच विचार करून आम्ही पत्रकारांनी एक सामाजीक भान ठेवून प्रथमत: हुतात्मा संकुल व परिसराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. याची सुरूवात मणदूर येथून केली. यावेळी पत्रकारांच्या या उपक्रमास मणदूर गावचे ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी हाता झाडू घेवून स्वच्छतेस प्रारंभ केला. यावेळी याठिकाणी सर्वात जास्त दारूच्या बाटल्या होत्या.
*नवनाथ पाटील*
संपादक, द शिराळा न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here