नवी दिल्ली-गुजरातमधील एका वेब पोर्टलच्या पत्रकारावरील खटला स्थगित करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने गुजरातच्या सत्र न्यायालयाला दिले आहे.भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्या प्रकरणी या पत्रकारावर खटला सुरू होता.12 एप्रिल पर्यंत या खटल्यास स्थगिती देण्यात आली आहे.
याचिकाकर्त्या पत्रकाराने खटला रद्द करण्यासाठी गुजरात हायकोर्टामध्ये याचिका केली होती.पण गुजरात हायकोर्टाने ती याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह जस्टीस ए.एम.खानविलकर आणि डी.वाय.चंद्रचुड यांच्या पीठाने ही सुनावणी केली.माध्यमांनी काहीही प्रकाशित करण्यापूर्वी अधिक जबाबदारीने वागायला हवे,असे निरीक्षण पीठाने नोंदवले.बेजबाबदार पणे पत्रकारिता करणे योग्य नाही.त्यात काहीतरी तथ्य असायला हवे,असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले.
जय शहा यांच्या वतीने बाजून मांडणारे,नीरज किशन कौल कोर्टात म्हणाले की,पत्रकारांना व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असले तरी,एखादा व्यक्ती राजकीय क्षेत्राशी संबंधित असेल तर त्याला लक्ष्य करण्याचे स्वातंत्र्य त्याला मिळत नाही.तर बचाव पक्षाची बाजू मांडणारे कपिल सिब्बल म्हणाले की,प्रश्न विचारणे हे पत्रकाराचे कर्तव्य असते.तुम्ही त्याला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखू शकत नाही.
दीव्य मराठीवरून साभार