प्रिय अमुचा महाराष्ट्र
मराठी पत्रकार परिषदेच्या चाळीसाव्या अधिवेशनात पत्रकारितेशी संबंधित विविध ज्वलंत विषयांवर परिसंवाद,चर्चा,मुलाखती तर होणारच आहेत त्याचबरोबर परिषदेच्या परंपरेनुसार 6 जून रोजी सास्कृतिक कार्यक्रम होणार आहे.यावेळी कलारंजन निर्मित आणि संकल्पना,दिग्दर्शन आणि निमााता उदय साटम यांचा प्रिय अमुचा महाराष्ट्र हा मराठमोळा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.शनिवारी रात्री साडेनऊ वाजता अंकुशराव लांडगे सभागृहातच हा कार्यक्रम होईल.या कार्यक्रमाचा रसिक पत्रकारांनी आनंद द्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे कऱण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला जोडूनच रायगडचे पत्रकार विजय पवार निर्मित पथनाट्ये सादर केले जाणार आहे.या पथनाटयाव्दारे पत्रकारांचे प्रश्न,त्यांची आजची स्थिती,पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकार करीत असलेले दुर्लक्ष,आणि पत्रकारांवरील हल्ले आदिवर भाष्ये केले जाणार आहे.याचाही आनंद पत्रकारांनी घ्यावा.
https://www.youtube.com/watch?v=d2Lv1UBP8Sk