सलमान प्रकरणाला माध्यमांनी अवास्तव कव्हरेज दिलं असा सूर व्यक्त होतंोय.सलमानसाठी दोन दिवस देणा़ऱी माध्यमं भूसंपादन विधेयक असेल किवा शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील अशा सामांन्यांशी निगडीत प्रश्नांकडं दुर्लक्ष करतात अशी टीका सातत्यानं केली जाते.माध्यमांवर केले जाणारे हे आऱोप खरे आहेत काय? आणि माध्यमांना खरोखऱच सामाजिक जबाबदारीचं विस्मरण झालंय काय? या विषयावर होत आहे एक लक्षवेधी चर्चा.मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात.या चर्चासत्रात सहभागी होत आहेत
शिवसेनेच्या प्रवक्तया मा.आ.निलमताई गोऱ्हे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी,राष्ट्रवादीचे प्रवक्ते अकुश काकडे,कॉग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन,सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन,पत्रकारांची बाजू मांडतील एबीपी माझाचे प्रसन्न जोशी,पुण्यनगरीच्या संपादिका राही भिडे आणि पुढारीचे निवासी संपादक अनिल टाकळकर.
एका महत्वाच्या विषयावरील हा परिसंवाद होत आहे,7 जून 2015 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या काळात.आपण सर्वांनी या परिसंवादास उपस्थित राहून मान्यवरांचे माध्यमांबद्दलचे विचार ऐकावेत
मऱाठी पत्रकार परिषद चाळीसावे अधिवेशन दिनांक 6 आणि 7 जून 2015
मराठी पत्रकारांची पहिली संघटना–मराठी पत्रकार परिषद
राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्यने अधिवेशनास उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती..