सडक्या राजकीय व्यवस्थेचा आणखी एक किळसवाणा प्रकार उघड
प्रत्येक कायक्रमात पत्रकारांकडून साधनशूचितेची आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा करणारी राजकीय व्यवस्था स्वतःकिती भ्रष्ट आहे,इतरांनाही भ्रष्ट्र कऱण्यासाठी कशी प्रयत्नरत असते याचा एका अत्यंत संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे.घटना आहे,ओडिसातील.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांना चक्क पैश्याची पाकिटं दिली गेली आहेत.या पाकिटात प्रत्येकी 500 रूपयांच्या नोटा होत्या.ही पाकिटं पाहिल्यानंतर पत्रकार हैराण तर झालेच त्याचबरोबर अनेक पत्रकारांनी संयोजनकांना धारेवर धरत ही पाकिटं त्यांना देऊन टाकली.एवढेच नव्हे तर पत्रकारांनी पोलिसात तक्रार दिली असून याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ओडिशातील अंगुल येथील दशहरा मैदानावर कार्यक्रम आयोजित केला गेला होता.यावेळी पत्रकारांना प्रेस नोट आणि किट देण्यात आले होते.पत्रकारंनी हे किट उघडल्यानंतर पत्रकारांना त्यात आणखी एक पाकिट दिसले.या पाकिटात 500 रूपयांच्या नोटा होत्या.पत्रकारानी या प्रकारास विरोधत तर केलाच त्याचबोरबर पोलिसात तक्रारही दिली आहे.पत्रकारांचं म्हणणं आङे की,असा प्रकार प्रथमच घडलेला नाही.
आपल्याकडंही अनेकदा अशी पाकिटं वाटप करतात.जी मंडळी पत्रकारांना निर्भिड,निःपक्ष पत्रकारितेचे सल्ले देतात आणि पत्रकारांनी चारित्र्यसंपन्न असावे अशी अपेक्षा करतात अशीच मंडळी पत्रकारांना भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतात.मुळात ही पाकिट संस्कृती का रूजविली जात आहे ?.याचाही विचार झाला पाहिजे.पत्रकारांना पाकिटं वाटायची आणि पत्रकार पाकिटं घेतल्याशिवाय बातम्या देत नाहीत म्हणून बोंबा मारायच्या असा हा प्रकार आहे.ओडिशामध्ये जे घडलंय,जे समोर आलंय त्याचा कोणताही पत्रकार निषेधच करीत.एवढं उघडं नागडं ओंगळ प्रदर्शन समोर यावं यावरून आपली राजकीय व्यवस्था किती सडली आहे हे लक्षात येतं.सकाळ -संध्याकाळ पत्रकारांच्या नावानं शिमगा करणार्या राजकीय नेत्यांनी नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची,पत्रकारांना आरोपीच्य ाकठडयात उभे करण्यापुर्वी थोडं आत्मचिंतन कऱण्याची गरज आहे.