“
राज्यपालांची भेट फलद्रूप ठरली
अधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा
मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन पत्रकारांना लोकल मधून प्रवास करण्याची सवलत द्यावी अशी मागणी केली होती.. आपण राज्य सरकारला त्यासंबंधी पत्र लिहिणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले होते..
आता राज्य सरकारने पत्रकारांची ही मागणी तर मान्य केली असली तरी त्यात नेहमीप्रमाणे अधिस्वीकृतीची मेख मारून ठेवली आहे.. म्हणजे फक्त अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच लोकलमधून प्रवास करता येईल.. गंमत अशी की, राजधानी मुंबईत ४०० पत्रकार देखील अधिस्वीकृती धारक नाहीत.. त्यामुळे बोटावर मोजण्या एवढे पत्रकार देखील या सवलतीचा लाभ घेऊ शकत नाहीत.. ९० टक्के पत्रकार सवलती पासून वंचितच राहणार आहेत.. त्यामुळे लोकलमधून प्रवास करण्याची सवलत दैनिक किंवा चॅनेलचे ओळखपत्र असलेल्या सर्व पत्रकारांना द्यावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी सरकारकडे केली आहे.. ..