प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत स्थापन केेलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने येत्या सोमवारी म्हणजे 3 एप्रिल रोजी खारघर येथे निदर्शनं करण्यात येणार आहेत.खारघर येथील उत्सव चौकात सकाळी 11 वाजता हे आंदोलन होणार आहे.तेव्हा आपण मोठया संख्येनं उपस्थित राहावं अशी विनंती आहे.
आपणास ज्ञात आहेच की,राज्यात पत्रकारांवर हल्ले वाढले आहेत.चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत आहे.30 तारखेला डीएनएचे सुधीर सुर्यवंशी यांच्यावर खारघर येथेच जीवघेणा हल्ला केला.त्यामुळं आंदोलनंही खारघर येथेच करण्याचं समितीनं ठरविलं आहे.त्या अगोदर उदय निरगुडकर तसेच विनोद यादव यांनाही धमक्या दिल्या गेलेल्या आहेत.आज सुधीर सुर्यवंशी जात्यात आहेत तर आपण सारे सुपात आहोत ही वेळ कोणावरही येऊ शकते.त्यामुळं आपली एकजूट दाखवून पत्रकार संरक्षण कायद्यासाठी सरकारवरील दबाब आपणास अधिक वाढवावा लागेल.त्यादृष्टीनं हे आंदोलन महत्वाचं आहे.आपल्या परिसरात हे आंदोलन होत असल्यानं ते यशस्वी कऱण्याची जबाबदार प्रामुख्यानं
ठाणे,रायगड,नवी मुंबई तसेच मुबंई, पुणे येथील पत्रकारांची आहे.मी आपणास नम्र विनंती करीत आहे की.मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे.पनवेल ते वर्षा रॅली आपण यशस्वी करून दाखविली होती.आता पुन्हा एकदा हा दणका देण्यासाठी एकत्र येणं आवश्यक आहे.तेव्हा प्लीज सर्वांनी यायचं आहे.संघटनात्मक भेद,व्यक्तिगत रागलोभ बाजूला ठेऊन आंदोलनाय सहभागी व्हायचं आहे.
आपला
एस.एम.देशमुख
निमंत्रक
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती.