पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार पेन्शन योजनेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष श्री.दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात शनिवार दिनंांक 14 जू न रोजी दुपारी 3 वाजता एका बैठकीचे आयोजन कऱण्यात आले आहे.या बैठकीस गृहमंत्री आर.आर.पाटील तसेच त्यांच्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी,कायदा विभागाचे अधिकारी,वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक आणि अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख तसेच समितीचे अन्य सदस्य आणि काही ज्येष्ठ पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
पत्रकारांना संरश्रक्षण देणारा कायदा व्हावा तसेच पत्रकार पेन्सनचा विषयही मार्गी लागावा या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती गेली चार वर्षे आंदोलन करीत आहे.या प्रश्नावर आता विधानसभा अध्यक्षांनीच पुढाकार घेतल्यानं काही मार्ग नक्की निघेल अशी शक्यता व्यकत् कऱण्यात येत आहे.,समितीच्या सर्व सदस्यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन समतीच्यावतीनं एस.एम.देशमुख यांनी केलं आहे.