पत्रकारांच्या गाडीवर गोळीबार

0
1510

रिओ ऑलिम्पिकदरम्यान पत्रकारांच्या बसवर अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये 3 जण जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

ऑलिम्पिंकच्या वार्तांकनासाठी जात असताना बसवर गोळीबार करण्यात आला. यावेळी बसमध्ये 12 जण बसले होते. मात्र, हा प्रकास कसा घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच नक्की गोळीबार करण्यात आला, की दगडफेक हे देखील समजू शकले नाही. जखमी झालेल्या तीघांवर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

एका पत्रकाराने सांगितले की, रिपोर्टींग करून झाल्यानंतर प्रेस सेंटरवर जात असताना अचानकपणे गोळीबाराचा आवाज आला. बसवर हल्ला होताच सर्वजण खाली झोपले. काहीवेळानंतर पोलिसांनी आम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here