पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा यामागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने सुरू केलेल्या चळवळीचे यश आता दृष्टीपथात आहे असं म्हणायला हरकत नाही.कारण केद्रातील नव्या सरकारचे माहिती आणि जनसंपर्क मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल मुंबईतील एका कार्यक्रमात स्पष्ट केलंय की,पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा देशपातळीवर लागू करण्याच्या दृष्टीनं सरकार विचार करीत आहे.माध्यमांची स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचा निर्वाळा जावडेकर यांनी दिला आहे,
मुंबईतील प्रेस क्लबच्या रेडइंक सन्मान पुरस्कारांचे वितरण काल करण्यात आले.या कार्यक्रमात बोलताना जवाडेकर म्हणाले,माध्यमांचं स्वातंत्र्य आम्हाला मुक्त मिळालेलं नाही.त्यासाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागलेला आहे.त्यामुळंच माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत.
माध्यमांवर होत असलेल्या हल्लयाबंद्दल चिंताव्यकत् करीत जावडेकर म्हणाले,हे हल्ले रोखले गेले पाहिजेत.काही राज्य सरकारांनी या दृष्टीनं पावले उचलली आहेत.आम्ही देखील क्रेंदीय कायदा करण्याच्या शक्यतेवर विचार करू असा कायदा करता येऊ शकेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
जावडेकर यांच्या भूमिकेचे स्वागत
———————–
महाराष्ट्रासह देशभर सर्वत्र पत्रकारांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय कायदा कऱण्याची तयारी जावडेकर यांनी तयारी दाखविली आहे.माध्यम स्वातंत्र्यासाठी असा कायदा होणे गरजेचे असल्याने आणि महाराष्ट्रात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती गेली चार वर्षे प्रयत्व करीत असल्यानं जावडेकर यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करीत आहोत असे मत समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुक यांनी व्यक्त केले आहे.हा कायदा लवकरात लवकर व्हावा अशी मागणी एस.एम.देशमुख यांनी केली आहे.