पत्रकारांच्या आंदोलनास अण्णा हजारे यांचा पाठिंबा

0
990

 राळेगणशिंदी दिनांक 5 ( प्रतिनिधी) समाजासाठी काम करणाऱ्या पत्रकारांना कायद्याने संरक्षण मिळालेच पाहिजे,सरकारने तातडीने तसा कायदा केला पाहिजे  अशी आग्रही मागणी करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 17 फेब्रुवारीच्या डीआयओ कार्यालयांना घेराव घालण्याच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केला.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या एका शिष्टमंडळाने आज राळेगणशिंदी येथे जाऊन अण्णा हजारे यांच्याशी अ र्धा तास र्चाा केली.गेल्या वर्षात महाराष्ट्रात 73 पत्रकारांवर हल्ले झाले,दोन पत्रकारांचे खून झाले,एका महिला पत्रकारावर अत्याचार झाले,आणि माध्मयांच्या पाच कार्यालयावर हल्ले केले गेल्याची माहिती अण्णांना सांगितल्यानंतर अण्णा संतप्त झाले. ङ्गकाय चाललंय हे ङ्ग ? असा सवाल करून लोकहिचाचे कायदे न करणाऱ्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अशी भावना व्यक्त केली.आरटीआय चे कार्यकर्ते असोत किंवा समाजासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते किंवा पत्रकार असोत यांना कायद्याचं सरक्षण असलंच पाहिजे आणि या संबंधीचा कायदा केवळ राज्यानेच नव्हे तर केंद्रानेही करायला हवा अशी मागणी त्यांनी केली.गेली काही वर्षे पत्रकार कायद्याची मागणी करीत आहेत पण ती मागणी पूर्ण केली जात  नाही याचे कारण हा कायदा कोणत्याच राजकीय पक्षाला नको आहे कारण त्यामागे राजकीय पक्षांचे हितसंबंध असल्याचे अण्णा हाजारे यानी स्पष्ट केले.

पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी करणारे एक पत्र आपण यापुर्वीच राज्य सरकारला पाठविले होते आणि पत्रकारांच्या या लढ्यास पाठिंबाही दिला होता अशी माहिती देत कायद्याच्या मागणीसाठी पत्रकारांना रस्त्यावर उ तरावे लागते ही बाब चांगली नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले.अण्णा हजारे यांना आज भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात समितीचे समन्वयक त था मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष  किरण नाईक,पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद पाबळे,उपाध्यक्ष सुनील वाळुंज,संतोष खेडेकर यांच्यासह नगर,पुणे येथील पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here