– मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी पत्रकारांचे उद्या पेणला आंदोलन
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने व्हावे आणि प्रवाश्यांना निर्धोक प्रवासाची सोय करून द्यावी या मागणीसाठी रायगड जिल्हयातील विविध पत्रकार संघटनांच्यावतीने सोमवारी पेण येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती रायगड प्रेस क्लबच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे 3 सप्टेंबर पुर्वी बुजविण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.काल त्यांनी पळस्पे ते इंदापूर रस्तयाची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासमवेत रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहताही होते.–