केरळच्या अनेक भागात पाऊस आणि पुरानं थैमान घातलं आहे.पुरामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.या नैसर्गिक आपत्तीचं बोटीतून रिपोर्टिंग क
रण्यासाठी गेलेल्या मातृ
भूमी टीव्हीच्या एका चमुची बोट उलटल्याने साजी नावाच्या एका स्ट्रिंजरला आपले प्राण गमवावे लागले आहेत.त्यांचा चालक बाबू अद्याप बेपत्ता आहे.23जुलैची ही घटनाय.कारीयार नदीला आलेल्या पुरामुळं मुंडूरचा भाग मुख्य भागापासून तुटलेला आहे.तेथे जाऊन रिपोर्ट करण्याचे आदेश मातृभूमी काार्यालयाकडून मिळाल्यानंतर चार जणांचा हा चमू बोटीनं मुंडूरला गेला.तेथील रिपोर्टिंग करून बातमी मुख्य कार्यालयाकडं पाठविल्यानंतर हा चमु परत येत असताना नदीच्या प्रवाहात बोट पलटीझाली आणि त्यात साजी आणिबाबू वाहून गेले.छायाचित्रकार आणि ब्युरोचीफ असलेल्या दोघांना वाचविण्यात यश आले आहे.साजीच्या मागे दोन मुलं आणि पत्नी असा परिवार आहे.साजी हा मातृभूमीसाठी स्ट्रिंजर म्हणून काम करीत होता.स्ट्रिंजरची जी अवस्था आपल्याकडं आहेत्यापेक्षा ती वेगळी केरळमध्ये असण्याची शक्यता नाही.कोणतीही सुविधा नाही,तुटपुंजे मानधन,जाहिरातीचा ससेमिरा अशा स्थितीत स्टिँजर्सना जिवावर उदार होऊन काम करावं लागलं.दुदैर्वानं एखादा अपघात झाला आणि त्यात स्टिॅींजरचं बरं वाईट झाला तर संबंधित मिडिया ग्रुप हात झटकून मोकळा होतो.साजी यांच्या कुटुंबियांना मातृभूमीनं काही मदत दिली की,नाही माहिती नाही पण बहुतेक वेळा स्टिँजरची कोणी काळजी घेत नाही हेच दिसून आलंय.तेव्हा पत्रकारांनी आपली डयुटीतर पार पाडली पाहिजेच मात्र जिवाची जोखीम उचलून अशी डयुटी करण्याचं काही कारण नाही.आपली सुरक्षा तेवढीच महत्वाची आहे याची जाणीव पत्रकारांनी ठेवली पाहिजे.आपण एखादया दुर्घटनेचे शिकार ठरलो तर आपल्याला कोणाची मदत मिळत नाही हे वास्तव असंख्य वेळा समोर आलेलं आहे.