कौतूक तर झालंच पाहिजे,
दुष्काळ निवारणात अनेक पत्रकारांचे महत्वाचे योगदान
मराठवाड्यातील दुष्काळात तेथील पत्रकारांनी केवळ करूण कहाण्याच दाखविण्याचे काम केले नाही तर दुष्काळ हटविण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नात सक्रीय सहभाग नोंदवत पत्रकार आपले उत्तरदायीत्व विसरले नाहीत हेच दाखवून दिले आहे.माजलगाव येथील पत्रकारांनी सिंधपना नदीचे पात्र लोकांना बरोबर घेत स्वच्छ केले.आज त्या नदीत पाणी साठ ले आहे.धारूर येथील पत्रकारांनी दुधिया तलावातील गाळ दिलासा संस्थेच्या मदतीने काढून या तलावाच्या सुशोभिकऱणाचे काम हाती घेतले आहे.नांदेड जिल्हयातील हादगाव येथील तालुका पत्रकार संघाने 500 झाडे लावण्याचा आणि त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प सोडला आहे.1 जुलै रोजी पत्रकार संघ हा उपक्रम करीत आहे.
सकाळचे पत्रकार तुषार खरात यांनी सातारा जिल्हय़ातील कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मान तालुक्यातील चार गावात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नदी खोलीकरण. , बंधारे बांधणे अशी कामे केली. तर सकाळचेच दुसरे पत्रकार संजय मिस्कीन यांनी पुढाकार घेऊन परांडा तालुक्यात नदी खोलीकरण आणि बंधाऱ्याचे काम केले. पहिल्याच पावसात दोन्ही ठिकाणी त्याचे चांगले परिणाम दिसून आले. भविष्यात या गावांना पाणी टंचाई भासणार नाही, असे सध्या तरी वाटतेय. पत्रकार, कीर्तनकार आणि कवी म्हणून ओळख असलेले ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना कीर्तनाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, दुष्काळाचा धीराने सामना करणे याबाबत प्रबोधन केले. लेखणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना अशी प्रत्यक्ष कामे ही अनेक पत्रकारांनी केली. काही पत्रकारांनी दुष्काळग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली तर काहींनी दुष्काळग्रस्तांसाठी येणारी मदत थेट गरजूपर्यत पोहोचते की नाही याची काळजी घेत खर्या अर्थाने जागल्याची भूमिका पार पाडली.अशी रचनात्मक कामं करणार्या तमाम पत्रकारांचे आणि पत्रकार संघांचे मनःपूर्वक अभिनंदन.–
http://goo.gl/NHknGx