उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुका पत्रकार संघाच्यावतीनं पत्रकारितेत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील आणि जिल्हयातील पत्रकारांचा विविध पुरस्कारांनी बुधवारी गौरव करण्यात आला.या कार्यक्रमास मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो.राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे , जयप्रकाश दगडे,सकाळचे खंदारे,दिव्य मराठीचे श्रीपाद सबनीस आदि मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.वडवणी तालुका पत्रकार संघाचे अनिल वाघमारे मुद्दाम कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाची दोन वैशिष्य्य़ मला दिसली.पहिले म्हणजे नगराध्यक्ष सोडले तर व्यासपीठावर कोणाही राजकीय पुढाऱ्यांना बोलावलं गेलं नाही.रायकीय मंडळी होती पण ती समोर.राजकारणी आपल्या व्यासपीठावर येतात,आपल्यालाच बोधामृत पाजतात .राजकारण्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज असताना पत्रकारांनी आत्मपरिक्षण करण्याचे सल्ले ते देत असतात.ते चालवून घेण्याचंंंंं कारण नाही हे कळंबकर पत्रकारांनी दाखवून दिलं.
दुसरं वैशिष्ठ्य असं की,कळंबच्या पत्रकारांमधील अभिनंदनीय एकजूट.शहरातील साऱ्या पत्रकार मित्रांनी एकत्र येत अत्यंत देखणा कार्यक्रम घेतला.पाचशेच्यावर पत्रकार,नागरिक उपस्थित होते.
कळंबच्या पत्रकारांचं आणखी एका कारणासाठी खास अभिनंदन केलं पाहिजे.सरकार पत्रकारांसाठी काही करीत नाही याची जाणीव एव्हाना साऱ्यांनाच झालीय.या पार्श्वभूमीवर कळंंब पत्रकार संघाने पत्रकारांसाठी विमा योजना राबविली आहे.याचा लाभ तालुक्यातील पत्रकारांना होणार आहे.उत्तर आय़ुष्यात किंवा एखादा अपघात झाला तर विम्यामुळं पत्रकारांना कोणासमोर लाचार होण्याची वेळ येणार नाही.या कार्याबद्दल कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश टोणगे ,सतीश मडके तसेच त्यांच्या अन्य सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद.राज्यातील इतर तालुका पत्रकार ंसंघानी देखील आता याचे अनुकरण करण्याची गरज आहे.यावेळी विमा योजनेसाठी उपस्थितांनी आर्थिक मदत जाहीर करून पत्रकारांच्या पाठिशी समाज उभा असल्याचे दाखवून दिले.नगराध्यक्षांसह ज्यांनी ज्यांनी कळंब तालुका पत्रकार संघास मदत केली त्यासर्वांना धन्यवाद.
उपस्थित सर्वच पाहुण्यांनी पत्रकारांनी एक होण्याची,आपल्या हक्कासाठी लढण्याची आणि ही लढाई लढताना समाजालाही बरोबर घेण्याचे आवाहन पत्रकारांना केले.