एक आनंदाची बातमी आहे,उद्या पेण येथे कोकणातील पत्रकारांच्या होणाऱ्या आंदोलनाच्या धास्तीने महावीर कन्स्ट्रक्शन आणि सुप्रिम इन्फा्रस्टक्चर या ठेकेदार कंपन्यांनी त्यांनीच तयार केलेल्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवायला आज दुपारनंतर सुरूवात केली आहे.मात्र आंदोलन केवळ खड्डे बुजावेत यासाठी नसून चौपदरीकऱण लवकर व्हावे यासाठी असल्यानं उद्याचं नियोजित आंदोलन होणारच असल्याचे रायगड प्रेस क्लब आणि रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाने जाहीर केले आहे