पता है? आखीर माहौल क्यू बदला?
अचानक असं काय घडलं की, सगळ्यांनाच पत्रकारांचा पुळका आला? बघा दुपारनंतर आठ – दहा नेत्यांनी पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे अशी मागणी करणारी पत्रं मुख्यमंत्र्यांकडे रवाना केली.. किंवा ट्विट करून तशी मागणी केली.. जी चॅनल्स पत्रकारांच्या प्रश्नांबददल कधी ब़ काढत नव्हती किंवा नसतात ती आज तमाम पत्रकारांचे तारणहार बणून अचानक सरकारला इशारे देऊ लागली.. एेरवी पत्रकारांच्या चळवळींना विरोध करणारे पोपट देखील बोलू लागले.. एका दिवसात सारा माहोल कसा बदलला याचा विचार गेली दोन – तीन तास मी करीत होतो.. थोडं उशीरा उत्तर मिळालं..
उद्याच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून घोषित करण्याचा निर्णय होणार असल्याची पक्की माहितीय.. इतरांना ती दुपारीच कळली आणि मग भराभर पत्रकं निघू लागली.. असं झालंच तर मग ते आपलयामुळंच झालं असा दावा करता यावा यासाठीची ही सारी तरतूद.. त्यामुळे उद्या निर्णय झाला रे झाला की, आम्हीच कसा हा विषय लावून धरला होता हे सांगत चॅनल्स टीआरपी वाढवत राहतील..
उद्याच्या गदारोळात मी, आपण कोठेच नसू कारण श्रेयासाठी आपण काम करीतच नाही.. श्रेय कोणाला घ्यायचंय ते घ्या, आम्हाला मतलब आहे तो सूर्य उगवणयाशी.. तो कोणाचा कोंबडा आरवलयाने उगवणार आहे ते मला महत्वाचे वाटत नाही..
पत्रकार फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर झाल्यानंतर लस मिळेल, उपचार मिळतील आणि पहिल्या जीआर मध्ये जो 50 लाखांचा उल्लेख आहे, दिवंगत पत्रकारांचे नातेवाईक त्याचे हक्कदार होतील..
एकच.. पुन्हा अधिस्वीकृतीची मेख मारू नये..म्हणजे झालं.. कारण राज्यात केवळ 2500 अधिस्वीकृती धारक पत्रकार आहेत आणि त्यातील बहुतेकांचा बातमी शी थेट संबंध राहिलेला नाही.. जे फिल्डवर काम करतात त्यातील 90 टक्के पत्रकारांकडे अधिस्वीकृती नाही.. म्हणजे अधिस्वीकृतीची मेख मारली तर त्याचा उपयोग होणार नाही.. म्हणूनच मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे की, सरसगट सर्व पत्रकारांना हा नियम लागू व्हावा.. पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा कोणताही प़यत्न आम्ही सहन करणार नाही .. मराठी पत्रकार परिषद असा कोणताही भेद मानत नाही..