परळी (प्रतिनिधी ) पीक  विमा भरतांना शेतकर्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या  पोलिसांचा फोटो  घेणाऱ्या  पञकार मिलींद चोपडे यांना अमानुष  मारहाण  करणाऱ्या  माजलगाव पोलिस  स्टेशन चे पो. उपनिरिक्षक अंधारे व इतर पोलिस कर्मचार्यांवर कारवाई  करण्याची  मागणी  परळी पञकार संघाच्या  वतीने  करण्यात  आली आहे .
   मिलिंद चोपडे हे दै. लोकाशाचे प्रतिनिधी  आहेत . ते काल माजलगाव येथे  जि. म. सह. बँकेत  पीक विमा भरण्यासाठी  गेले होते , या वेळी पोलिसांनी  शेतकर्यांवार लाठीचार्ज सुरू  केला . अनेक  शेतकरी  यात जख्मी झाले . या घटनेचा  व्हिडिओ शुटींग करणाऱ्या  पञकार मिलिंद चोपडे यांना  पो.उप. नि. अंधारे,पो. कॉ. शिनगारे यांनी  अमानुष  मारहाण  केली . एवढया वर  न थांबता त्यांना  पोलिस  गाडीत कोंबले.गाडीत व पो. स्टेशन  मध्ये  आणुनही मारहाण  केली .
  या मारहाणीत चोपडे जख्मी झाले असुन या  घटनेचा दोन्ही परळी पञकार संघाच्या ता. अध्यक्षानी , शहर अध्यक्षांनी , पदाधिकारी व शहरातील वर्तमान पत्रांचे संपादक तथा सर्व पत्रकार बांधवानी जाहीर निषेध  केला  असुन संबंधित पोलीस अधिकारी  व पोलिस कर्मचारी विरूध्द  पञकार संरक्षण कायद्याने  कारवाईची करावी अशी मागणी  केली  आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here