न्यूजलेस कविता,परिषदेच्या अधिवेशनात सर्वाचं आकर्षण ठरणारा कार्यक्रम
रोजचं धकाधकीचं जीवन,त्याच त्या रूक्ष बातम्यांनी पत्रकारांचं मनही अांंबून जातं.त्यामुळं पत्रकारामधला कवी,त्याच्यातला साहित्यिक कधी मरून जातो ते कळतही नाही.मात्र अशा वातावरणातही काही पत्रकार आपल्यातल कवीला जाणीवपूर्वक जपत असतात.अशा मुंबईतल्या काही पत्रकार कवींनी एकत्र येत एक छानसा कार्यक्रम बसविला आहे.न्यूजलेस कविता असं त्याचं नाव.पंकज दळवी,सुरेश ठमके,श्यामसुंदर सोन्नर,भिमराव गवळी,रचना विचारे,आणि प्रशांत डिंगणकर हे मुंबईतील पत्रकार सादर करणार आहेत न्यूजलेस कविता.मराठी पत्रकार परिषदेच्या शेगाव अधिवेशनात.या कवितांमधून व्यक्त होणार आहेत पत्रकाराचं भावविश्व,पत्रकारांची दुःख,पत्रकारांच्या वेदना,पत्रकारांच्या गंमती-जमती.राजकारणावर आणि शेती प्रश्नावर भाष्य करणार्या कविता सादर होताना या सार्या प्रश्नांकडं पत्रकार किती गांभीर्यानं बघतात ते आपणास अनुभवता येणार आहे.तेव्हा चुकवू नका,न्यूजलेस कवितांचा आगळा-वेगळा कार्यक्रम–
20 AUGUST
5,30 T0 7 PM