लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर महाराष्ट्रातील कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खांदेबदलाची च र्चा सुरू झाली आहे.या चर्चेचा अ र्थ एवढाच की,लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची जी दाणादाण उडालीय त्यापासून या पक्षांनी काही बोध किंवा धडा घेतलेला नाही.निवडणुकीतील पराभवाचं खापर एकाच्या किंवा चार-चौघांच्या माथी फोडून येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जाणारी ही रणनीती असावी.ती यशस्वी होण्याची शक्यता नाही.याचं काऱण लोकसभेत जो पराभव झाला आहे तो एखादं-दुसऱ्या निर्णयामुळं किंवा एखादं -दुसऱ्या व्यक्तीच्या चार -दोन दिवसाच्या “कर्तबगारीमुळं” झालेला नाही.या पराभवाला पंधरा वर्षांची दीर्घ पार्श्वभूमी आहे. त्यासाठी अनेक नेत्यांचेही “हातभार” लागलेले आहेत.आघाडी सरकारची पंधरा वर्षांची कारकीर्द तपासा ,या काळात राज्यात बेबंदशाही होती.भ्रष्ट्रचार शिगेला पोहोचला होता,कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागली होती, महिला सुरक्षित नव्हत्या ना पत्रकार निर्धास्तपणे आपलं काम करू शकत होते ,महागाईनं लोकांना जगणं मुश्किल केलं होतं,सरकारी पातळीवरची निष्क्रियताही जनतेच्या जिवावर बेतत चालली होती.सारी परिस्थिती जनतेला असह्य झाली होती.त्यातून मतदारांनी लोकसभेत परिवर्तनासाठी मतदान केलं. म्हणजे जे घडलं त्याला अनेक घटक जबाबदार होते.मोदी लाट वगैरे म्हटलं जात असलं तरी ते तेवढं खरं नाही .मोदींनी “आम्ही समर्थ पर्याय असू शकतो ” असा विश्वास जरूर दिला.पण मोदींकडं बघून लोकांनी मतदान केलं असं माननं लोकांनी पंधरा वर्षात जे अश्रू गाळलेत त्याची वंचना केल्यासारखं आहे. मचेदींनी विश्वास दाखविला.लोकांनी त्यांच्यांवर विश्वास ठेवला. मुळात लोकांना बदल करायचाच होता तो मोदीना संधी देऊन केला .हा बदल करताना ज्यांना आपण नाकारतो आहोत त्यांचे चेहरेही युती,आघाडी किंवा अन्य माध्यमातून पुन्हा दिसता कामा नयेत याची काळजी मतदारांनी घेतली. त्यासाठीच मतदारांनी भाजपच्या झोळीत भरभरून माप टाकलं.गेल्या तीस वर्षात जे घडलं नव्हतं ते मतदारांनी घडवून आणलंं. मतदारांच्या रागाची पातळी पराकोटीला गेलेली होती एवढाच जनतेच्या या कौलाचा अ र्थ होता.. अशा स्थितीत लोकभावना एवढ्या पराकोटीला का गेली याचं चिंतन ,आत्मपरिक्षण दोन्ही कॉग्रेस पक्षांनी करणं गरजेचं होतं.ते झालंय आणि त्या अंगानं काही दुरूस्त्या केल्या गेल्यात असं दोन्हीकडं दिसलेलं नाही.उलटपक्षी पराभवानंतरही अत्यंत उध्दटपणे आपल्या पापांवर पांघरून घालण्याचाच प्रयत्न होताना दिसतो आहे.याचं एकच उदाहरण देता येईल.सिंचन घोटाळ्यातून अजित पवारांना वाचविण्याचा प्रयत्न केला गेला.खापर अधिकाऱ्यांवर फोडलं.सिंचन घोटाळा अधिकाऱ्यांनीच केला असेल तर मंत्री म्हणून अजित पवारांची काहीच जबाबदारी नाही का ? य ाचं उत्तर कोणीच देत नाही.चितळे समितीच्या अहवालात अजित पवार यांना क्लीन चीट दिलेली नाही तरीही ” मला चि तळे समितीनं क्लीन चीट दिल्याचं” अजित पवार सांगत फिरत आहेत.या सर्वाचा अ र्थ पराभवांपासून कोणीच काही शिकायला तयार नाही असा होतो.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा अजित पवार यांना काय वाटतं? जे काही चाललंय ते जनतेला दिसत नाही किंवा कळत नाही काय ? सारं दिसतंय,अन कळतंय देखील.पण जनता आता गप्प आहे.ती आपला आणखी एक फैसला विधानसभेच्या वेळेस देणार आहेच. आश्चर्य याचं वाटतंय की, चाणाक्ष आणि जनतेची नाडी ओळखण्यात माहिर असलेल्या असलेल्या शरद पवारांना हे का समजत नाही याचंं, काळाची गरज आणि जनतेचा कल लक्षात घेऊन लोकोपयोगी ठरतील असे काही बदल त्यांनी पक्षीय पातळीवर आणि नेत्यांच्या वागण्या-बोलण्यात करायला हवेत . ते होत नाहीत. केवळ तेच ते खांदेबदलाचे प्रयोग शरद पवार करण्यास सज्ज झाले आहेत. भास्कर जाधव यांना आणले कोणी ? शरद पवारांनीच ना.? भास्कर जाधव पक्षाध्यक्ष झाले त्याला पार्श्वभूमी होती त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात केलेल्या करोडोच्या उधळपट्टीची. त्यांच्या या उधळपट्टीवरून राज्यात मोठा संताप होता. त्याकडं दुर्लक्ष करीत नव्हे तर जनतेच्या जखमेवर मीठ रगडत पवारांनी भास्कर जाधवांना चिपळूनमधून उ चलंलं आणि थेट प्रदेशाध्यक्ष केलं.बरं केलं तर केलं, त्यांना पुर्ण स्वातंत्र्यही दिलं नाही. जितेंद्र आव्हाडांना कार्याध्यक्ष करून त्यांच्या गळ्यात कोलदांडा अडकविण्याचंही काम केलं. आता निवडणुकीत जाधवांना काही प्रकाश पाडता आला नाही म्हणून बदलायचं चाललं आहे.राष्ट्रवादीची रचनाच अशी आहे की,त्या पक्षात कोणीही तालेवर नेता जरी प्रदेशाध्यक्ष झाला तरी तो काही दिवे लावू शकत नाही.आता जाधव गेले आणि सुनील तटकरे आले की, पक्ष पातळीवर फोर मोठे सकारात्मक बदल घडतील असं नाही.प्रदेशाध्यक्षांना काम करू न देण्याचीच नीती पक्षाची आहे.केवळ एक चेहरा हवा असतो.खापर फोडण्यासाठीचं साधनंही आवश्यक असतं.त्याचसाठी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असतो.तो नेमताना जाती पातीचा विचार हा प्राधान्यानं केलेला असतो.आमचा पक्ष मराठ्यांचा नाही हे दाखविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मराठेतर जातीचा असेल याची काळजी घेतली जाते.लोकसभेच्या वेळेस भाजपनं गोपीनाथ मुडे यांच्या नेतृत्वाखाली सोशल इजिनिअरिंग केलं होतं.त्याला शह देण्यासाठी भास्करराव जाधव या मराठा नेत्याला प्रदेशाध्यक्ष केलं गेलं होतं.त्याचा मराठयांची मतं घेण्यासाठी काही उपयोग झाला नाही. त्यामुळं आता त्यांना ओबीसी प्रदेशाध्यक्ष द्यायचाय.त्यासाठी सुनील तटकरे,छगन भुजबळ,आणि जितेंद्र आव्हाड या ओबीसी नेत्यांच्या नावांची च र्चा सुरू आहे. .नवा ,तरूण मत दार जातीच्या अशा फसव्या गोष्टींच्या आहारी जात नाही हे लोकसभेच्या वेळेस दिसून आलंय तरी पवार आपले जातीपातीचे कार्ड खेळण्यातच गर्क असतील तर त्याचेही परिणाम त्यांना नक्कीच भोगावे लागतील, मतदारांना जो बदल हवाय तो गुणात्मक पातळीवरचा हवाय,व्यवस्था लोकाभिमुख कऱणारा,लोकांचे अश्रू पुसणारा आणि त्यांना जगण्याची नवी उमेद देणारा बदल लोकांना अपेक्षित आहे. वैचारिक आणि सैध्दांतिक पातळीवरचा बदल लोकांना हवाय, त्या अंगानं कोणी विचार करीत नाही.बदल करायचाच तर लोकांशी तुटलेली नाळ पुनर्प्रस्थापित करू शकणारा बदल झाला पाहिजे, नेत्यांमधील मग्रुरी दूर करून ं जनतेच्या उत्तरदायी राहणारा बदल लोकांना हवा आहे..त्यासाठी कोणाची तयारी नाही,म्हणून तसा बदल होताना दिसत नाही.जोवर असे बदल होणार नाहीत तोवर केवळ व्यक्ती बदलून काही होणार नाही हे नक्की. नेतृत्वाच्या पातळीवर बदल करून आपण लोकांची दिशाभूल करू शकू असं जर दोन्ही पक्षांच्या हायकमांडला वाटत असेल तर ते जनतेची नव्हे तर स्वतःचीच दिशाभूल करून घेत आहेत असं म्हणावं लागेल..याचं कारण लोकसभेला मतदान करताना मतदारांचा कोण्या एका व्यक्ती विशेषवर राग नव्हताच.तो राग सर्वानी मिळून राबविलेल्या व्यवस्थेवरचा होता.जी व्यवस्थाच लोकांना मान्य नाही ती तशीच चालू ठेऊन व्यक्ती बदलण्याची खेळी म्हणूनच फलद्रुप होणारी नाही. अशा स्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांना बदलून किंवा भास्कर जाधव यांना बाजूला सारून कॉग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यातील जनतेची मनं जिंकू शक़णार नाहीत.पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी सुशीलकुमार शिंदे याना आणले तर फार फार तर काय होईल,? राष्ट्रवादी नेत्यांच्या भानगडीच्या ज्या फाईली मुख्यमंत्र्यांकडं पडून आहेत त्या क्लीअर होतील यापेक्षा वेगळं काही होणार नाही असं लोक उघडपणे बोलतात. शिवाय येणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडं अन्य काही कऱण्यासाठी वेळही असणार नाही.जेमतेम दोन महिने हातात आहेत.या दोन महिन्यात सरकारची गेलेली पत आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवायची असेल तर येणाऱ्या मुख्यमंत्र्याला येताना अल्लाउद्दीनचा जादूचा दिवाच बरोबर घेऊन यावं लागेल तरच हे शक्य आहे. अन्यथा नाही. कॉग्रेस हायकमांडलाही हे सारं कळायला हवंय. अहमद पटेल यांच्या सारख्या दरबारी राजकाऱण्याच्या सांगण्यावर भरोसा ठेऊन सोनिया गांधी काही नि र्णय घेणार असतील तर ते ना त्यांच्या पक्षाच्या ना महाराष्ट्राच्या हिताचे ठरतील.एक गोष्ट स्पष्ट आहे की, महाराष्ट्रात कॉग्रेसचा जो पराभव झाला आहे त्याला एकटे मुख्यमंत्रीच जबाबदार नाहीत, त्याला पक्ष नेतृत्वही तेवढंच जबाबदार आहे.स्वतः सोनिया गांधी आणि राहूल गांधींचाही पक्षाच्या पराभवात तेवढाच वाटा आहे.पण त्यांच्या खुर्च्या टिकून आहेत आणि पृथ्वीराज यांना मात्र हटविले जात आहे. त्याांचा अपराध ते नि र्णय घेत नाहीत एवढाच आहे.पण त्यावर त्यांचंही काही सांगणं आहे .पृथ्वीराज चव्हाण नेहमी सांगतात की ,” “मी भानगडीच्या फाईलींवर सह्या करीत नाही” .या भानगडीच्या फाईली राष्ट्रवादीच्याच जास्त आहेत.त्यामुळे फाईलीवर सह्या न करून राष्ट्रवादीची कोंडी कऱणारे पृथ्वीराज चव्हाण तेव्हा चालत होते.आज ते चालत नाहीत हे कसे ? – याचे दोन अथ र् होतात एक तर पृथ्वीराज चव्हाण हे शरद पवारांना नको आहेत म्हणून बदलायचे आहेत किंवा कॉग्रेस हायकमांड नावाची जी जबरव्यवस्था होती ती आता खिळखिळी झाली आणि कोणताही नि र्णय घेण्याची क्षमताच आता या बलाढ्य व्यवस्थेकडं उरलेली नाही.कारण कोणतंही असो पण खांदेबदलाचा नि र्णय़ कॉग्रेसच्या गळ्याशी येणारा ठरणार यात शंकाच नाही. भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीत एकतरी प्रामाणिक नेता होतो तो देखील खुपला नाही म्हणून त्याचा परिणाम उलटाही होऊ शकतो.शिवाय मुळात मत दारांचा राग मुख्यमंत्र्यांवर नव्हताच.त्यांची निष्क्रीयताही पराभवाला पूर्णपणे कारणीभूत नव्हती .जनता उबगली होती ती भ्रष्ट्राचाराला.तो मुद्दा आहे तेथे ठेऊनच बदल केले जात आहेत.भास्कर जाधव यांच्या जागी ज्यांची वर्णी लागणार म्हणून ज्यांच्या नावांची च र्चा आहे ते देखील फार धुतल्या तांदळासारखे आहेत असं नाही.त्यामुळं दोन्ही पक्षांना भ्रष्टाचाराचा तिटकारा आलाय,किवा सुशासनासाठी बदल करायचाय असं दिसत नाही.नेतृत्वात बदल करून त्यांना जनतेच्या डोळ्यात धुळफेक करायचीय एवढाच काय तो या बदलाचा अ र्थ आहे.
एस.एम.देशमुख