नेरूळ -उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून येत्या जुलै2017 पासून पहिल्या टप्प्यातील नेरूळ ते खारकोपरपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्यादृष्टीने चाचपणी सुरू करण्यात आली आहे.भूसंपादन आणि अन्य कारणांनी रखडलेलेे पुढील मार्गाचे काम पुढील सव्वा वर्षात पूर्ण कऱण्याचा निर्धार सिडकोने केला आहे.सिडकोनं जुलै1997 पासून नेरूळ-उरण या 27 किलो मिटरच्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार केला होता.सिडको आणि रेल्वेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचा खर्च आरंभी 1492 कोटी रूपये एवढा निर्धारित करण्यात आला होता मात्र नंतर तो 1782 पर्यंत गेला आहे.भूसंपादन,खारफुटीचा प्रश्न आदि कारणांमुळे हे काम रेंगाळले होते.मात्र आता पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून जुलैपासून रेल्वे सुरू होऊ शकेल.या रेल्वेमुळे उऱणच्या विकासाला चालना मिळणार आहे –