मांडवा ते अलिबाग या पट्ट्यात अनेक धनिकांचे बंगले आहेत.विजय मल्ल्याचा आलिशान बंगला मांडव्यात आहे तर नीरव मोदी या लफंग्याचा बंगला अलिबागनजिक किहिम बीचवर आहे.सीआरझेड कायदा धाब्यावर बसवून हे बंगले उभारले गेले असले तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही.विजय मल्ल्या चुना लावून पसार झाल्यावर त्याच्या बंगल्याला सील ठोकले गेले.नीरव मोदीच्या बंगल्यावर अजून कारवाई झालेली नाही.असं सांगितलं जातंय की,बंगल्यात लपविलेलं किमती सामान आणि कागदपत्रे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.नीरव दीपक मोदी या नावाने किहिम ग्रामपंचायतीत या बंगल्याची नोंद आहे.जेव्हा आता इडी या बंगल्यावर कारवाई करेल तेव्हा हाती काहीच लागणार नाही.बंगला बेकायदेशीर आहे म्हणून नोटिसा तर पाठविल्या गेल्या पण कारवाई झाली नाही.
हा बंगला केव्हा बांधलेला होता..युपीएच्या काळात की एनडीएच्या ..मला माहिती नाही..भक्तांनी त्याचा जरूर शोध घ्यावा म्हणजे आमच्या काळात बांधला असता तर आम्ही बांधकामाला परवानगी दिलीच नसती आणि दिली असती तरी तो नंतर जमिनदोस्त केला असता असं म्हणायला मंडळी मोकळी..