लढा आपल्या हक्काचा,वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठीचा..
अगोदर युपीतील जगेंद्रंसिंहला जिवंत जाळलं,आता मध्य प्रदेशात त्याची पुनरावृत्ती झाली.तरूण पत्रकार संदीप कोठारी यांची जाळून अत्यंत अमानुषपणे हत्त्या कऱण्यात आली.महाराष्ट्रात तर दर चार दिवसाला एक पत्रकार हल्लेखोरांचा शिकार ठरत आहे.अलिकडेच नाशिक आणि जळगाव येथे पत्रकारांवर हल्ले करण्यात आले. गेल्या सहा महिन्यात राज्यात 41 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.देशभर घडत असलेल्या या घटनांमुळे माध्यमांच्या स्वातंत्र्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे.या विरोधात आता संघटीत आवाज उठविण्याची वेळ आली आहे.वृत्तपत्र स्वातंत्र्यास निर्माण झालेला धोका आणि माध्यमांंतील लोकांच्या तीव्र भावनांचा विचार करून पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीनं उद्या दिनांक 23 जून 2015 रोजी दुपारी 12 वाजता आझाद मैदान येथे निदर्शने करण्यात येत आहेत.त्यानंतर राज्यपाल महोदयांची भेट घेऊन आपल्या तीव्र भावना त्यांच्यापर्यत पोहोचवयाच्या आहेत.आपणासर्वांना विनंती आहे की,
पत्रकारांच्या हक्कच्या या लढयात मोठया संख्येनं सहभागी व्हावे आणि आपल्या एकीचे दर्शन घडवावे ही विनंती.
प्रत्येकाशी व्यक्तिगत संपर्क साधने वेळेअभावी शक्य झाले नाही . त्यामुळं ही पोस्ट टाकत आहे.आपण मोठया संख्चनें उपस्थित राहावे ही पुनश्च विनंती.कळावे
निमंत्रक,
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मुंबई