रायगड जिल्हतील नऊ नगरपालिकेसाठी उद्या मतदान होत असून जिल्हयात कोठेहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.मतदानासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.त्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या नेतृत्वाखाली 432 पोलीस अधिकारी,तीन एसआरपीएफच्या कंपन्या,दोन शीघ्र कृती दलाच्या कंपन्या तैनात कऱण्यात येत आहेत.26 ते 28 असे तीन दिवस जिल्हयात सर्वप्रकारच्या मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
नऊ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी जिल्हयात 40 उमेदवार मैदानात आहेत.त्यात 23 महिला आणि 17 पुरूषांचा समावेश आहे.नगरसेवकपदाच्या 80 जागांसाठी 524 उमेदवार मैदानात आहेत.सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या काळात मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता येणार असून मतमोजणी सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.–