अलिबागः पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या अलिबागनजिकच्या किहिम येथील बंगला लवकरच जमिनदोस्त केला जाणार आहे.राज्य शासनाच्यावतीने गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात यासंबंधीची माहिती सादर करण्यात आली.नीरव मोदींप्रमाणेच अन्य 57 बेकायदा बांधकामाविषयी नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्यावरही लवकरच कारवाई होणार असल्याचे सरकारने न्यायालयाला सांगितल्याने अलिबाग परिसरातील बंगलेवाल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अलिबाग तालुक्यातील वरसोली,सासवणे,धोकीवडे,आदि गावे सीआरझेड क्षेत्रात येत असून या गावांमधील जमिनी ना विकास क्षेत्रात येतात.असे असताना निरव मोदी तसेच इतर उद्योगपती,सिने कलावंत,खेळाडूंनी जमिनी खरेदी करून बंगले उभारले.निरव मोदींचा बंगल्याचा यात समावेश आहे.हे बंगले पाडले जावीत अशी जनहित याचिका दाखल केली होती.मात्र कोर्टाच्या आदेशानंतरही आदेशाची अंमलबजावणी झाली नाही.न्यायालयाने यासंबंधी नाराजी व्यक्त केली आहे.त्यानंतर हा विषय गंभीरपणे घेत तातडीने कारवाई करण्यात येईल असे न्यायालयास सांगण्यात आले.