तुमचा दाभोळकर- पानसरे होईल अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना जिवे मारण्याची काल धमकी दिली गेली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती याचा तीव्र शब्दात धिक्कार करीत आहे.एका फेसबुक अकाउंडवरून ही धमकी दिली गेल्याने पोलिसांनी याची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी समितीने केली आहे.निखिल वागळे यासंदर्भात पोलिसात तक्रार करणार असल्याचे समजेत.एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत निखिल वागळे यांनी म्हटले आहे की,माझी जर हत्त्या झाली तर त्याला महाराष्ट्र पोलीसच जबाबदार असतील.
दरम्यान ज्या जाधव नावाच्या व्यक्तीनं ही धमकी दिलीय तो टाटा कम्युनिकेशन्सचा ठेकेदार म्हणून काम करीत असल्याचे समजते.टाटानं या व्यक्तीवर कारवाई करीत त्याच्याकडील ठेका रद्द केला आहे,तसे ट्टिट टाटा कम्युनिकेशन्सनं केलं आहे.