आयबीएन -लोकमतचे एडिटर ईन चीफ निखिल वागळे हल्ली प्राईम टाईम किंवा आजचा सवालमध्ये दिसत नाहीत.त्यामुळे हे कार्यक्रम सुनेसुने वाटायला लागले आहेत.सांगितलं असं जातंय की,त्यांची प्रकृत्ती ठीक नसल्यानं ते रजेवर आहेत.चर्चा अशीही आहे की,राजदीप सरदेसाई,सागरिका घोष यांच्या पाठोपाठ निखिल वागळे देखील नेटवर्क-18 ला गुडबाय करणार आहेत.निखिल वागळे यांनी चार दिवसापूवी केलेल्या ट्विटने आफवांचा बाजार अधिक गरम झाला.वागळे यांनी मुंबईच्या जीवनाचा आपल्याला आता कंटाळा आला असून आता आपण या सर्वापासून दूर जाऊ इच्छितो असे त्यांनी या टिव्टमध्ये म्हटले होते
राजदीप सरदेसाई यांनीच निखिल वागळे यांना आयबीएनमध्ये आणले.राजदीप यांचा निर्णय रास्त होता हे आयबीएनला मिळालेल्या लोकप्रियतेनं दाखवून दिलं होतं.नंतरच्या काळात वागळे यांचे काही शिलेदार त्यांना सोडून गेले त्याचा टाआरपीवर नक्कीच परिणाम झाला पण निखिल वागळे होस्ट असलेले प्राईम टाईम आणि आजचा सवाल या दोन शोची लोक़प्रियता मात्र कमी झाली नाही.महानगरच्या माध्यमांतून मराठी वृत्तपत्रसृष्टीत स्वतःच्या नावाची वेगळी ओळख आणि दबदबा निर्माण करणा़ऱ्या वागळे यांनी दूरदर्शनच्या अनेक कार्यक्रमात होस्ट म्हणून सहभाग नोंदविला होता.एबीपी न्यूज,झी न्यूजच्या अनेक काय4क्रमातही ते सहभागी व्हायचे.आयबीएन-लोकमत सुरू झाल्यानंतर ते तेथे जॉईन झाले.रोखठोक स्वभाव आणि जेपीच्या समाजवादी चळवळींचा विचारावर प्रभाव असलेल्या निखिल वागळे यांचे जसे अनेक समर्थक आहेत तसेच त्यांचे विरोधकही मोठ्या प्रमाणात आहेत.आजचा सवाल मध्ये ते अनेकांना नागडे करीत.त्याची ही शैली अनेकांना आवडत नाही.ते समोऱचा गुन्हेगार आहे असे गृहित धरून त्याच्या अंगवार धावतात,चर्चेत इतरांना बोलू देत नाहीत,समोरचा आपला मुद्दा मांडत असताना त्याला मध्येच आडवतात,जे आपणास हवे तेच ते पॅनलवरील वक्त्यांकडून वदवून घेतात अशी टीका त्यांच्यावर अनेकजण करीत असले तरी त्यांचा आजचा सवाल त्यांचे टिकाकारही न विसरता बघतातच बघतात.थेट प्रश्न,बिनधास्त स्वभाव यामुळे निखिल वागळे अनेकदा अडचणीतही आलेले आहेेत.त्यांच्यावर केवळ शिवसेनाच नव्हे तर अन्य राजकीय पक्षांच्या लोकांनीही हल्ले केलेले आहेत.मात्र अशा धमक्या किंवा हल्ल्याला न घाबरता त्यांनी आपली पत्रकारिता निर्भयपणे सुरू ठेवलेली आहे.पत्रकारितेच्या माध्यमातून त्यंानी सामाजिक चळवळींना बळ देण्याचेही काम नेहमीच केले आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे ते नेहमीच समर्थक राहिले आहेत.पत्रकाराना कायदेशीर संरक्षण,पेन्शन मिळाले पाहिजे असे ते स्पष्टपणे सांगतात.पत्रकारांना निर्भयपणे काम करता आले पाहिजे असे त्यांचे आग्रही प्रतिपादन असते.अन्य अनेक सामाजिक चळवळींनाही बळ देण्याचे काम निखिल वागळे यांनी केले आहे.
रिलायन्सने नेटवर्क-18खरेदी केल्यानंतर आपले तेथे जमणार नाही असे त्यांना वाटत होते.त्यातच ज्यांनी त्यांना आयबीएनमध्ये आणले ते राजदीप सरदेसाईच आता तेथून गेल्याने निखिल वागळे काय निर्णय घेतात याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.वागळेंचा निर्णय काय असेल माहिती नाही पण गेली काही दिवस ते प्राईम टाईममध्ये दिसत नाहीत,आजच्या सवालच्या माध्यमातून प्रश्न विचारत नाहीत आणि त्याची ग्रेट भेटही होत नाही त्यामुळे अनेक प्रेक्षकांना चुकल्या चुकल्या सारखेच वाटते.असे वाटणा़ऱ्यात त्यांचे हितचिंतक.त्यांच्यावर प्रेम करणाऱे जसे आहेत तसेच त्याचे विरोधकही आहेत.एखादया संपादकाच्या किंवा अँकरच्या लोकप्रियतेची यापेक्षा वेगळी पोच पावती ती काय असू शकते