परिषदेच्या नांदेड अधिवेशनासाठी
नाशिक जिल्ह्यातून ३५० पत्रकार जाणार
प्रतिनिधि ।पिंपळगांव( ब )
नांदेड येथे १७ व १८ ऑगस्ट रोजी होणाय्रा मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या अधिवेशनास नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे ३५० सभासद पत्रकार सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली.
पिंपळगाव बसवंत येथे स्व अशोकराव बनकर पतसंस्थेच्या सभागृहात नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी व तालुकाध्यक्ष यांची संयुक्त बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की,मराठी पत्रकार परिषद,मुबई हि देशभरातील मराठी पत्रकारांची पहिली संघटना असून मातृसंस्था असलेल्या परिषदेच्या आजवर झालेल्या प्रत्येक अधिवेशनात नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांची लक्षणिय उपस्थिती राहिली आहे.
हि परंपरा नांदेड येथील अधिवेशनात कायम राहणार असून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सुमारे साडेतिनशेहून अधिक सभासद उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त केला,
स्वागत निफाड तालुकाध्यक्ष अँड रामनाथ शिंदे यांनी केले.
सरचिटणीस कल्याणराव आवटे यांनी प्रस्ताविक करुन तालुकानिहाय अधिवेशन नियोजनाचा आढावा घेतला.नरेंद्र पाटील विभागीय सचिव अण्णासाहेब बोरगुडे रवींद्र बोरसे, सुधाकर गोडसे, हिरामण चौधरी,अँड रामनाथ शिंदे आदींनी चर्चेत सहभाग घेत नियोजनाबाबत मनोगते व्यक्त केली.