अलिबागः माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कर्नाळा-तारा भागातील फार्म हाऊसची भिंत आज पाडण्यात आली.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे..या कामात ही भिंत अडथळा ठरत होती.नारायण राणे यांच्या फार्म हाऊसची 890 व 1320 चौरस मीटर जागा रूंदीकरणात जात असल्यानं त्याचा मोबादला म्हणून राणे यांना 1 कोटी 36 लाख रूपये देण्यात आले होते.तरीही त्यांच्या फार्म हाऊसवर कारवाई होत नसल्याने हा विषय परिसरात चर्चेचा झाला होता.नारायण राणे यांच्या जागेला वळसा घालून काम सुरू असल्याने अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला होता.या संबंधीच्या बातम्या वर्तमानपत्रातही आल्या होत्या.अखेर आज भूसंपादन विभागाने ही कारवाई केली.कर्नाळा-तारा परिसरातील जवळपास 30हून अधिक घरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.