पत्रकारांना फ़न्टलाईन वर्करचा दर्जा मिळाला पाहिजे :नाना पटोले
मालवण : महाराष्ट्रातील पत्रकारांना फ़न्टलाईन वर्करचा दर्जा देऊन त्या अंतर्गत मिळणारया सर्व सुविधा त्यांना दिल्या जाव्यात ही कॉग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे..
मालवण येथे पत्रकार परिषदेत मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नंदकिशोर महाजन यांनी राज्यात 135 पत्रकारांचे बळी गेले असले तरी राज्य सरकार पत्रकारांना फ़न्टलाईन वॉरियर्स चा दर्जा द्यायला तयार नसल्याची बाब नाना पटोले यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नाना पटोले यांनी वरील भूमिका स्पष्ट केली..
ते म्हणाले, मुंबईला परत गेल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेकडून दिवंगत पत्रकारांची यादी मागवून घेऊन आम्ही सर्व दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांचे सांत्वन करूच शिवाय त्यांना कॉग्रेसकडून अर्थसहाय्य देखील करू असेही पटोले यांनी सांगितले… नाना पटोलेे यांनी पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे अशी मागणीी केली आहे.. यापुर्व अनेक मंत्र्र्यनी पत्र पाठवून तशी मागणी केली असली तरी ठाकरे सरकार या विषयााव आजही मौन बाळगून आहे.. र