पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य व हवेली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष,पुणे जिल्ह्यातील मांजरी खुर्द येथील दै.पुढारीचे वार्ताहर नाथाभाऊ उंद्रे यांना मांजरी खुर्द येथील मटका व्यवसायिकाकडुन झालेल्या शिवीगाळ,जीवे मारण्याची धमकी व धक्काबुक्कीच्या निषेधार्त आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक,मराठी पत्रकार परिषद,मुंबईचे अध्यक्ष आदरणीय एस.एम.देशमुख सर यांनी नाथाभाऊ उंद्रे यांची मांजरी खुर्द,पुणे येथे त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.घडलेल्या घटनेची सर्व माहिती घेऊन,पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी फोनद्वारे अशा घटना घडु नये व पत्रकारांना संरक्षण मिळावे याबाबत चर्चा केली.याप्रसंगी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष कोबल सर, सरचिटणीस प्रभाकर क्षिरसागर,जिल्हा कार्यकारणी सदस्य संदिप बोडके,हवेली तालुका पत्रकार संघाचे सदस्य दै.लोकमतचे वार्ताहर जितेंद्र आव्हाळे,जेष्ठ सदस्य राजकुमार बापु काळभोर,दै.पुण्यनगरीचे वार्ताहर विजय लोखंडे,दै.लोकमतचे वार्ताहर चेतन दिघे,दै.लोकप्रभातचे वार्ताहर शिलवंत कांबळे,मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुभाष(बंधु) गायकवाड,हवेली तालुका पत्रकार संघाचे सचिव व दै.केसरीचे वार्ताहर गणेश सातव आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.