नागपूर अधिस्वीकृतीची उद्याची बैठक वादळी ठरणार

0
792

नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीची उद्या होणारी बैठक वादळी ठरणार असं दिसतंय.कारण विद्यमान अध्यक्ष कोरटकर यांनी दिलेला राजीनामा मागे घेतल्यानंतरही अधिकार नसताना स्टेट कमिटीनं त्रिपाठी यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.राज्य अधिस्वीकृती समितीला कोणत्याही विभागाचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाही,असं असतानाही मनमानी पध्दतीनं ही नियुक्ती केली गेली आहे.त्याला नागपूर विभागीय समितीतील सदस्यांचा विरोध आहे.गंमत म्हमजे लातूर विभागीय समितीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर तेथील सर्व सदस्यांनी निवडणूक घेऊन नवा अध्यक्ष नेमला.तो नियम नागपूरमध्ये लावला गेला नाही.कारण स्टेट समितीच्या अध्यक्षांना  नागपूरमध्ये आपल्याला हवा तो अध्यक्ष निवडून आणता आला नाही.आता नियमांची मोडतोड करून विभागीय अधिस्वीकृती समिती ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतोय.त्याला विभागीय समितीतील सदस्यांचा विरोध आहे.त्यामुळं उद्याची बैठक वादळी ठरणार हे स्पष्ट दिसतंय.त्या संबंधीचे एक पत्र विभागीय सदस्यांनी महासंचालकांना पाठविले आहे.गंमत म्हमजे संचालक राधाकृष्ण मुळी यांच्यावर लातूरला एक आणि नागपूरला वेगळा नियम लावण्याची वेळ त्यांच्या वरिष्ठांनी आणली असल्यानं उद्या ते काय भूमिका घेतात हा चर्चेचा विषय आहे.मुळी लातूरला असताना त्यांनी बैठकीत मतदान पध्दतीनं नवा अध्यक्ष निवडला.आता त्यांची बदली नागपूरला झालीय तेथे ते वरू न लादलेल्या अध्यक्षांना घेऊन कामकाज करण्याचा प्रयत्न कऱणार आहेत.याचे पडसाद स्टेट कमिटीतही उमटणार असून नियमांची मोडतोड होत असताना डोळेझाक कऱणार्‍या सदस्य सचिवांना जाब विचारला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here