नांदेड अधिवेशन ऐतिहासिक होणार

0
1176


नांदेड अधिवेशन ऐतिहासिक होणार

अडीच हजार पत्रकारांची उपस्थिती अपेक्षित 

मुंबईः 17 आणि 18 ऑगस्ट 19 रोजी नांदेड येथे होत असलेले मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे अधिवेशन ऐतिहासिक आणि अविस्मरणीय करण्याचा निर्धार काल येथे झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला.एस.एम.देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.यावेळी परिषदेचे सर्व पदाधिकारी तसेच अधिवेशनाचे आयोजक नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

17 आणि 18 असे दोन दिवस हे अधिवेशन होईल.17 तारखेला सकाळी अधिवेशन दिंडीने अधिवेशनाची सुरूवात होईल.सकाळी उद्दघाटन सोहळा झाल्यानंतर दुपारच्या सत्रात ज्वलंत विषयांवरचे दोन परिसंवाद होतील.रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम होईल.18 तारखेला सकाळी एका ज्येष्ठ पत्रकाराची मुलाखत जनता की आदालत स्वरूपात होणार असून त्यानंतर परिषदेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे खुले अधिवेशन पार पडणार आहे.यामध्ये नऊ विभागातून प्रत्येकी एका पत्रकाराला आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे.खुल्या अधिवेशऩात माध्यमांसमोरील अडचणी,पत्रकारांच्या प्रती सरकारची भूमिका या विषयांवर तर चर्चा होईलच त्याचबरोबर परिषदेच्या कार्याची पुढील दिशा परिषदेचे पदाधिकारी स्पष्ट करतील.दुपारच्या सत्रात समारोपचा कार्यक्रम होणार असून त्यात अनेक मान्यवर आपली मतं मांडणार आहेत.नांदेड येथून परतीसाठी सायंकाळी 5 च्या सुमारास गाडया असल्याने अधिवेशनाचा समारोप चारपर्यंत करावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.त्यादृष्टीने विचार करण्यात येईल.

अधिवेशनास यावेळेस रेकॉर्डब्रेक गर्दी होईल अशी अपेक्षा आहे.त्यादृष्टीने अडीच हजार पत्रकारांची निवास आणि भोजणाची व्यवस्था स्थानिक संयोजन समितीच्यावतीने करण्यात येत आहे.अधिवेशऩास येणार्‍या पत्रकारांकडून नोंदणी शुल्क म्हणून प्रत्येकी 100 रूपये घेतले जातील.त्याचबरोबर पत्रकाराची व्यक्तीगत माहिती असणारा एक फॉर्म भरून घेतला जाईल ज्यामुळं भविष्यात परिषद थेट संबंधित पत्रकाराशी व्यक्तीगत संपर्क साधू शकेल.प्रतिनिधींना पेण,पॅड,फाईल्स दिले जातील.शिवाय राहण्याची आणि भोजणाची मोफत व्यवस्था करण्यात येत आहे.येणार्‍या पत्रकारांची गैरसोय होऊ नये म्हणून नांदेड स्टेशन आणि बस स्थानकावर स्वागत कक्ष उभारण्यात येणार असून तेथून अधिवेशन स्थळी जाण्यासाठी पत्रकारांसाठी वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे.अधिवेसऩास येऊ इच्छिणार्‍या पत्रकारांनी आपल्या शहरातून किती पत्रकार येणार याची आगाऊ सूचना सरचिटणीस अनिल महाजन यांच्याकडे केल्यास नियोजनाच्यादृष्टीने सोयीचे होईल असे आवाहन कऱण्यात आले आहे.या महत्वपूर्ण बैठकीस एस,एम देशमुख यांच्याशिवाय विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन,कोषाध्यक्ष शदर पाबळे,सोशल मिडिया सेलचे निमंत्रक बापुसाहेब गोरे,सुनील वाळुंज,उपाध्यक्ष शिवराज काटकर,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर,सरचिटणीस लोणे रवी संगनवार आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची भेट

———

नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्याना अधिवेशनाचे उद्दघाटन करण्याची विनंती केली आहे.यावेळी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष खासदार प्रताप पाटील चिखलीकर,परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागापुरकर,परिषदेचे माजी सरचिटणीस चारूदत्त चौधरी,रवी संगनवार आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here