नांदेडः मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या जिल्हा संघांच्यावतीने आपल्या सदस्यांसाठी सातत्यानं विविध उपक्रम राबविले जात असतात.बीडमध्ये दिवंगत भास्कर चोपडे यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांना सदस्यांनी आर्थिक मदत तर केलीच पण शंकरराव चव्हाण कल्याण निधीतून मदत मिळावी यासाठी देखील पाठपुरावा केला.आज एक लाखाची मदत प्राप्त झाली आहे.नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघानं आपल्या सदस्यांसाठी मोफत प्रतिबंधात्मक औषधांचं वाटप करण्याचा कार्यक्रम 25 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आलेला आहे.सरकारवर फारसं अवलंबून न राहता आपल्या सदस्यांच्या हितासाठी आपणच पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत या धोरणानुसार राज्यभर असे उपक्रम सुरू असतात.येत्या 3 डिसेंबर रोजी म्हणजे परिषदेच्या वर्धापन दिनी राज्यातील 350 तालुक्यात पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेतली जाणार आहेत
*पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी श्री चंद्रप्रभा होमिओ क्लिनिकच्या वतीने मोफत प्रतिबंधात्मक औषधी वाटप*
 
सध्या डेंग्यू , स्वाईन फ्लू, निमोनिया, कावीळ आदी जंतूसंसर्ग रोगांनी थैमान घातले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन अचानक प्लेटलेटस कमी होणे असे प्रकार वाढून शेकडो रुग्ण दगावत आहेत.
 
या रोगांपासून बचाव व्हावा यासाठी होमिओपॅथी मध्ये प्रभावी प्रतिबंधात्मक औषधी उपलब्ध आहेत.
 
मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सभासद, त्यांचे कुटुंबिय, नांदेड जिल्हा वृतपत्र वितरक मंडळाचे सदस्य व त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी श्री चंद्रप्रभा होमीओ क्लिनिक, गार्गी हाईट्स, शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ, नांदेडचे डॉ. अशोक बोनगुलवार यांच्या वतीने मोफत प्रतिबंधात्मक होमिओपॅथी औषधींचे वाटप करण्यात येणार आहेत.
 
ज्यांना सदर औषधी हवी असतील त्यांनी आपली नावे दि. २५ ऑक्टोबर पर्यंत पत्रकार संघाचे सरचिटणीस सुभाष लोणे यांच्याकडे 9049060289 9595600853 व वृतपत्र वितरक मंडळाचे गणेश वडगांवकर 9850267291 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन नोंदवावीत.
या संधीचा सर्वांनी लाभ घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*प्रदीप नागापूरकर*
अध्यक्ष
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here