*पत्रकार,माध्यमातील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी* *2 एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर*
 
श्री चंद्रप्रभा होमिओ क्लिनिक व नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम
 
नांदेड येथील श्री चंद्रप्रभा होमिओ क्लिनिकच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्री चंद्रप्रभा होमिओ क्लिनिक व मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार, माध्यमातील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी सोमवार दि.2 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मोफत आरोग्य तपासणी व होमिओ पॅथीक औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
 
डॉ.अशोक बोनगुलवार यांचे श्री चंद्रप्रभा होमिओ क्लिनिक गार्गी हाईटस शिवाजीनगर उड्डाण पुला जवळ, गोकुळनगर, नांदेड येथे होणार्‍या या शिबीराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते होणार आहे.
 
या समारंभास उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी, माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी, दै.सकाळचे सहयोगी संपादक दयानंद माने, दै.लोकमतचे निवासी संपादक विशाल सोनटक्के, प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, परिषद सदस्य राम शेवडीकर, प्रकाश कांबळे, विभागीय सचिव विजय जोशी दै. देशोन्नतीचे निवासी संपादक अनिल कसबे, वृत्तपत्र वितरक संघटनेचे राज्य सरचिटणीस बालाजी पवार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, नांदेड होमिओ पॅथीक कॉलेजचे अध्यक्ष डॉ.हंसराज वैद्य, प्रसिद्ध उद्योजक अब्दुल वहीद, प्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
 
या शिबीरात नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभासदांसह जिल्ह्यातील सर्व पत्रकार, माध्यमातील सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांची मोफत आरोग्य तपासणी व होमिओ पॅथीक औषधोपचार करण्यात येणार आहे.
 
मेंदूचे विकार व मानसिक समस्या डिप्रेशन, स्त्रियांचे पाळी संबंधी आजार व वंधत्व, जुनाट डोकेदुःखी (मायग्रेन) झोपेच्या समस्या, त्वचेची ऍलर्जी, त्वचा रोग, मुत्र मार्गाचे आजार, मुळव्याध, फिशर, भगंदर, वात दोष, मान पाठ, कंबरदुःखी, मधुमेह, हृदयाचे आजार, कॅन्सर, इतर दुर्धर आजार, डोळ्याचे आजार, थायराईड, पोटांचे आजार, आम्लपित्त, काविळ, व्यसनमुक्ती, स्वशन संस्थेचे आजार, केसाचे व सौंदर्याच्या समस्या आदी आजारांवर उपचार केले जाणार आहेत. *विशेष म्हणजे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विशेष औषधीचे वाटप यावेळी केले जाणार आहे*
 
या शिबीराचा सर्व पत्रकार, माध्यमातील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घ्यावा. तसेच या शिबीरात सहभागी होण्यासाठी सरचिटणीस सुभाष लोणे यांच्या 9049060289 या व्हॅटस्‌अप क्रमांकावर दि.1 एप्रिल पर्यंत नांव नोंदणी करावी, असे आवाहन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर, कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी, सरचिटणीस सुभाष लोणे, संयोजक डॉ.अशोक बोनगुलवार व पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here