नांदेड/प्रतिनिधी
नांदेडमधील पत्रकारांच्या आरोग्यासाठी 75 लाख रूपयांच्या आरोग्य निधीची तरतूद महापालिकेनं करावी अशी मागणी आज नांदेड जिल्हा पत्रकार संघानं महापालिका महापौर आणि आयुक्तांची भेट घेऊन केली आहे.परभणीमध्ये देखील यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत..
शासन, प्रशासन आणि जनता यामधील समन्वयाचा दुवा असलेल्या पत्रकाराच्या आरोग्यासाठी मुंबई महापालिकेसारखेच नांदेड महापालिकेने देखील ७५ लाख रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार परिषद संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची शनिवारी भेट घेवून केली आहे.
शहराच्या सर्वांगिण विकासात शासन, प्रशासनासोबत पत्रकारांचेही तितकेच योगदान असते. सर्वसामान्य माणूस व विकासाभिमूख कामांना पत्रकारांनी नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून एक प्रकारे शासनाचा मदतच करतो. हे करत असतांना तो आजारी पडल्यास त्याची आर्थिक घडी विस्कळीत होते. त्याला व त्याच्या परिवाराला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सतो. त्यासाठी तो धडपडत असतो. अशा बिकट परिस्थितीत पत्रकारांना आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. कल्याण, डोंबीवली, अकोला, सोलापूर, मुंबई महापालिकेने पत्रकारांच्या आरोग्यासाठी अशी भरीव आर्थिक तरतूद केली आहे.
त्यामुळे नांदेड महापालिकेने देखील या धर्तीवर पत्रकारांच्या आरोग्यासाठी साधारत: ७५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार परिषद संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची शनिवारी भेट घेवून केली आहे. निवेदनावर विजय जोशी, प्रकाश कांबळे, प्रदीप नागापूरकर, गोवर्धन बियाणी, सुभाष लोणे, राजेश शिंदे, कृष्णा उमरीकर, चारूदत्त चौधरी, अनिकेत कुलकर्णी, अभय कुळकजाईकर, नंदकुमार कांबळे, अनुराग पोवळे, कमलाकर बिराजदार, राजकुमार कोटलवार, गोविंद करवा, सचिन डोंगळीकर, नरेन्द्र गडप्पा, हैदरअली, मुनवरखान, ज्ञानेश्वर सुनेगावकर, बुध्दभुषण सोनसळे, मुंतजीब आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच निवेदनाच्या प्रती महापौर सौ.शीला किशोर भवरे, उपमहापौर विनय गिरडे पाटील, स्थायी समिती सभापती शमीम अब्दुलल्ला, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले यांना देण्यात आल्या.
परभणीतही तरतूद होणार
परभणी महापालिकेच्यावतीने पत्रकारांच्या आरोग्यासाठी वीस लाखांची तरतूद करावी अशी मागणी मनपा सद्स् सचिन देशमुख यांनी केली आहे.एका ठरावाद्ारे त्यांनी ही मागणी केली असून गटनेते भगवानराव वाघमारे यांनी त्यास अनुमोदन दिले आहेत.विरोधी पक्ष नेते विजय जामकर यांनी देखील या ठरावास पाठिंबा दिला आहे.आयुक्त राहुल रेखावार यांनी या ठरावास संमती दर्शवत आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले आहे.या निधीबद्दल परभणी शहरातील पत्रकारांनी आयुक्त महापौर,उपमहापोर,स्थायी समिती सभापती नगरसेवक सभागृह नेते व सर्व सदस्यांचे आभार मानले आहेत.मराठी पत्रकार परिषदेने देखील या सकारात्मक भूमिकेबद्दल मनपाला धन्यवाद दिले आहेत.–