नांदेडः नांदेड येथून प्रसिध्द होणार्या श्रमिक एकजूट दैनिकाचे मालक ,संपादक तथा राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य कृष्णा शेवडीकर यांना एका प्रकरणात बिलोली येथील सत्र न्यायालयाने तीन लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.या घटनेने माध्यम जगतात खळबळ उडाली आहे.
एक व्यावसायिक शेख अब्दुल यांच्या विरोधातल्या एका बातमीत त्यांच्याबद्दल श्रमिक एकजूट्च्या बातमीत भूमाफिया,हरामखोर, दमदाटी,ब्लॅकमेलिंग असे असांसदीय आणि बदनामीकारकर शब्द वापरले गेले होते.यामुळे आपली बदनामी झाल्याची तक्रार शेख अब्दुल यांनी बिलोली न्यायालयात करून शेवडीकर यांच्या विरोधात खटला दाखल केला होता.( विशेष खटला नंबर सी.एम,.नं.01/2012 ) 2012 च्या या खटल्याचा निकाल 22 जून 2016 रोजी लागला असून या प्रकरणात कृष्णा शेवडीकर आणि अन्य एकास न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना तीन लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.बातमी निःपक्ष असली पाहिजे अशी अपेक्षा असते.असे असतानाही अत्यंत आक्षेपार्ह शब्द बातमीत वापरल्याने शेख अब्दुल यांची बदनामी झाल्याचे सिध्द झाले असून शेवडीकर यांना तीन लाख रूपये दंड ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान “ज्या पत्रकारावर गुन्हा दाखल आहे अशा पत्रकाराला अधिस्वीकृती देता कामा नये अशा नियम अधिस्वीकृतीच्या मुळ नियमात आहे.मात्र हा नियम गैरसोयीचा ठरत आहे ,असे दिसल्यानंतर नवा जीआर न काढताच ज्या पत्रकाराला शिक्षा झालेली आहे त्याला अधिस्वीकृती दिली जाऊ नये असा नियम तयार केला गेल .आता कृष्णा शेवडीकर यांच्यावरील गुन्हा सिध्द झाला असून त्यांना दंडाची शिक्षा झालेली आहे त्यामुळे त्यांचे अधिस्वीकृती कार्ड रद्द करावे आणि त्यांची अधिस्वीकृती समितीवरील नियुक्ती रद्द करावी अशी मागणी पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार तथा सांजवार्ता दैनिकाचे संस्थापक संपादक विनोद कुलकर्णी यांनी मुख्यामंत्र्यांकडे एका पत्राव्दारे केली आहे.या संदर्भात योग्य ती कारवाई झाली नाही तर सप्टेंबर 2016 मध्ये शिर्डी येथे होणार्या अधिस्वीकृती समितीच्या राज्यस्तरीय बैठकीसमोर उपोषण कऱण्याचा इशारा विनोद कुलकर्णी यांनी दिला आहे.आता शेवडीकर यांचे आका कार्ड आणि समिती कशी वाचविली जाते याकडे राज्यातील पत्रकारांचे लक्ष लागले आहे.
फार उपयुक्त माहिती सर