त्रकारांच्या चळवळीचं फलित काय? असा प्रश्न अनेक जण विचारतात.. पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला, पेन्शनची घोषणा झाली,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या ठेवीतील रक्कम वाढली.. इतरही अनेक गोष्टी साध्य करता आल्या.. हे झालं व्यावहारिक उत्तर.. ही चळवळ पत्रकारांच्या हक्काचे प्रश्न सोडविण्यासाठी सुरू झाली हे तर खरंच पण माझ्यासाठी ही चळवळ पत्रकारांना एकजूट करण्याचं माध्यम होतं. पूर्वी अनेकांचा समज असा होता की, बुध्दीजिवी असल्यानं दोन पत्रकार ही एकत्र येत नाहीत.. ते एकत्र येऊ नयेत यासाठी राजकारणी देखील प्रयत्न करायचे.. त्यात ते यशस्वी देखील व्हायचे.. पत्रकारांमधील ही दुही माझ्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय असायचा.. त्याविरोधात आम्ही सुरूवात रायगडपासून केली.. तेथील पत्रकारांना एकजूट करण्यासाठी म्हणून मुंबई – गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाचा विषय हाती घेतला. सारे पत्रकार एक झाले.. पाच वर्षे लढा चालला. या निमित्तानं एकत्र आलेले पत्रकार एक कुटुंब म्हणून काम करू लागले.. त्यानंतर पत्रकार संरक्षण कायद्यासाठी सोळा संघटना एकत्र आल्या.. त्यातून कायदा झाला.. पेन्शनचा विषय मार्गी लागला.. दोन पत्रकार एकत्र येत नाहीत अशा समज करून बसलेल्यांना ही चपराक होती.. ही चळवळ आता एवढी भक्कम झालीय की, कोणत्याही काय॓क़मास ४०० – ५०० पत्रकार सहज जमा होतात.. आणखी एक झालं. परस्पर मदतीची भावना बळकट झाली. एखादा पत्रकार आजारी असेल, एखाद्या पत्रकाराचं निधन झालं असेल तर अशा कुटूंबासाठी राजयभरातून मदतीचा ओघ सुरू होतो. बीडचे पत्रकार भास्कर चोपडे आजारी असताना हे दिसलं. त्याचं निधन झाल्यानंतर देखील त्यांच्या कुटुंबाला मदत केली गेली.मराठी पत्रकार परिषदेचया पुढाकाराने गेल्या दीड वषा॓त २९ पत्रकारांना जवळपास ३० लाखांची मदत दिली गेली आहे.. सरकार नेहमीच पक्षपात करते.. त्यामुळे यापुढे सरकारवर अवलंबून राहायचे नाही असं परिषदेने ठरविले.. गरजू पत्रकारांसाठी पत्रकारांनी मदत करायची असं ठरविलं गेलं आहे.. त्यातूनच काल नांदेडमध्ये एका पत्रकाराच्या कुटुंबाला मदत केली गेली.. विकास भालेराव असं या पत्रकाराचं नाव. सिडकोतून पत्रकारिता करायचा.. तरूणपणीच निधन झालं. सारेच हळहळले.. पण केवळ कोरड्या सहानुभूतीनं काही होणार नव्हतं.. जिल्हा पत्रकार संघानं मदतीचा हात पुढं केला. दुख:तही स्वागतार्ह गोष्ट अशी की, केवळ जिल्हा मराठी पत्रकार संघच नव्हे तर तालुका पत्रकार संघ देखील भालेराव कुटुंबियांच्या मदतीला धावून आले.. कंधार पत्रकार संघ, तसेच अन्य तालुका पत्रकार संघांनी आर्थिक मदतीबरोबरच भालेराव यांच्या कुटुंबाला कायम स्वरूपी उत्पन्नाचे साधन म्हणून शिलाई माझ्या हस्ते श्रीमती भालेराव यांना दिली गेली. . ही मदत तुटपुंजी आहे हे खरंच.. पण पत्रकारांमध्ये मदतीची भावना निर्माण झाली ही गोष्ट अन्य कोणत्याही बाबी पेक्षा महत्वाची आहे.. दोन दिवस मी हिंगोली, परभणी, नांदेडच्या दौरयावर होतो. या दोरयात अनेक उपक्रम सुरू केले गेले.. भालेराव कुटुंबियांना दिली गेलेली मदत हा काय॓क़म मन हेलावून टाकणारा, आणि पत्रकार संघटनेचं हेच खरं काम आहे याची जाणीव करून देणारा होता. राज्यातील एकही पत्रकार यापुढे एकाकी असणार नाही मराठी पत्रकार परिषद प्रत्येक पत्रकाराच्या पाठिशी आहे हा विश्वास सार्थ ठरविण्यात या निमित्तानं आम्ही यशस्वी होत आहोत याचा आनंद नक्कीच आहे.. नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी भालेराव यांच्या कुटुंबियांना मदत करून पत्रकार चळवळ एक पाऊल पुढे नेण्यास मदत केली आहे.. प्रदीप नागापूरकर, प़काश कांबळे.. आणि त्यांच्या तमाम सहकारयांचे अभिनंदन.. मित्रांनो, बहोत खूब.. असंच काम करीत रहा
एस. एम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here