नम्र निवेदन

0
567

नम्र निवेदन

मराठी पत्रकार परिषद म्हणजे एक कुटुंब.. परिषदेच्या कुटुंब App च्या माध्यमातून हा परिवार अधिक बळकट करणे, कुटुंबाबाहेर असलेल्यांना परिवारात सामावून घेणे आणि त्यांची अभेद्य एकजूट करण्याचा प्रयत्न आहे.. परस्पर संपर्क आणि समन्वय साधण्यासाठी देखील भविष्यात हे APP अधिक लाभदायक ठरणार आहे.. म्हणजे किनवटचा एखादा पत्रकार सावंतवाडीला गेला, किंवा जव्हारचा एखादा पत्रकार रामटेकला गेला आणि तेथे त्याचा काही प्रॉब्लेम झाला तर सावंतवाडी किंवा रामटेकला कोण पत्रकार मित्र आहेत त्याची माहिती आपणास या App च्या माध्यमातून मिळणार आहे.. या अ‍ॅपवर कॉलिंगची देखील व्यवस्था असल्याने आपणास थेट संबंधित पत्रकाराशी थेट संपर्क करता येईल आणि आपणास हवी असलेली मदत काही क्षणात मिळविता येईल.. म्हणजे परिषदेचं एक मोठं, राज्यव्यापी नेटवर्क या माध्यमातून तयार होत आहे..
“आम्हाला कोणी विचारत नाही” अशी ग्रामीण पत्रकारांची सततची तक़ार असते.. यापुढे माहूर पासून ते मोखाडा पर्यत आणि कणकवली पासून ते कळमेश्वर, सावली आणि अन्य छोट्या मोठ्या तालुक्यातील पत्रकारांचा आवाज या app च्या माध्यमातून मुंबई, पुण्यात बसलेल्या परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकारयांपर्यत पोहचणार आहे.. प्रत्येक तालुका, जिल्हा आणि व्यक्तीगत प़त्येक पत्रकार वरिष्ठ पदाधिकारयांशी जोडला जाणार असल्याने आम्हाला एस. एम. देशमुख यांच्यापर्यंत पोहचू दिले जात नाही ही तक्रार करायला कोणाला जागा उरणार नाही.. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी हे app महत्वाची भूमिका पार पाडणार आहे..
आपले हक्क, आपल्या मागण्या आता अधिक जोरदारपणे मांडता येतील आणि एका आवाजात आपण व्यक्त होणार असल्याने सरकारला आपली दखल ही घ्यावीच लागेल..
आज अवघ्या ७ तासात ११००पेक्षा जास्त पत्रकार अँपच्या माध्यमातून थेट परिषदेशी जोडले गेले आहेत.. राज्यातील अन्य सर्व पत्रकारांना विनंती आहे की, जास्तीत जास्त संख्येने पत्रकारांनी परिषदेच्या कुटुंब या अॅपशी कनेक्ट होऊन चळवळ पुढे नेण्यासाठी हातभार लावावा..
मराठी पत्रकार परिषद ही ८२ वर्षांची संस्था असली तरी ती नेहमीच काळाबरोबर चालत आली म्हणूनच ८२ वर्षांची वाटचाल ती करू शकली.. आजची गरज लक्षात घेऊन परिषद काळाबरोबर राहण्याचा प्रयत्न करीत आहे.. या प़यत्नात आम्हाला आपली साथ हवी आहे..
आपले कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी हे app विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.. त्यांचे आभार आणि अभिनंदन..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here