नगर आणि पिंपरीत पत्रकारांवर हल्ले
पुणेः दोन दिवसात पत्रकारांवरील ह्ल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.पहिली घटना नगर येथे घडली.पत्रकार विठ्ठल शिंदे यांना प्रोफेसर चौकात पोलिसांनी बेदम मारहाण केली.काय गुन्हा होता पत्रकाराचा तो कायद्याचा आणि सर्वाना समान न्याय लावण्याचा आग्रह धरीत होता..प्रोफेसर चौकात एका वकिलानं मधोमध गाडी लावली होती.पोलिसांनी त्याला हटकले तर तो पोलिसांशी अरेरावी करीत होता.त्यामुळं प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.मात्र वकिलाच्या दमदाटीला घाबरून पोलिसांनी त्या वकिलाला सोडून दिले.यावर विठ्ठल शिंदे यांनी हरकत घेत पोलिसांना जाब विचारला..वकिलाच्या जागेवर एखादा सामांन्य नागरिक असता तर तुम्ही त्याला एवढी दया दाखविली असती का असा सवाल विचारला.हा सवाल उपनिरीक्षक पिंपळे,पोलीस कॉन्स्टेबल आव्हाड,बाहाकर आदिंनी विठ्ठल शिंदे यांना बेदम मारहाण केली.एवढेच नव्हे तर शिंदे यांना पोलीस व्हॅनमध्ये घालून तोफखाना पोलीस ठाण्यात आणले आणि शिंदे यांना शिविगाळ करीत तेथेही मारहाण केली.सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी आग्रह धरणार्या पत्रकाराला पोलिसांनी कट्टर आरोपीसारखी वागणूक दिली.या घटनेचा नगर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला आहे.समितीच्या एका शिष्टमंडळाने निमंत्रक मन्सूरभाई यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांची भेट घेऊन संबंधित पोलिसांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकाराच्या घरावर हल्ला
पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार संघाचे सदस्य व तेज रफ्तार चे संपादक संतलाला यादव यांच्या घरावर आज सकाळी काही समाजकंटकांनी हल्ला केला.पिंपरीमधील पत्रकार गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांमध्ये गेले आहेत.हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे यांनी केली आहे.