अहमदनगर जिल्हयातील जामखेड येथील पत्रकार सांताराम सूळ आणि राहता येथील अशोक सदाफळ या पत्रकारांना विरोधात बातम्या दिल्याच्या कारणावरून धमकया देण्याचा प्रकार नुकताच घडला.जामखेडमधील भोयकर वाडी परिसरात नितीन खेतमाळीस यांचे स्टोनक्रशर असून त्याच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेती पिकांवर परिणाम होत आहे.त्याबाबत बातम्या आल्यानंतर सरकारने स्टोनक्रशर सिल करण्यात आले.त्यानंतरही स्टोनक्रशर सुरू करण्याचा प्रयत्न केला.त्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण केली गेली.याची तक्रार पोलिसात दिली गेलीय.त्याची बातमी घेण्यासाठी संताराम सुळे यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली गेली.
राहता येथे विरोधात बातम्या छापल्यामुळे पत्रकार अशोक सदाफळे यांना नगराध्यक्ष कैलास सदाफळे यांनी दमदाटी आणि धमक्या दिल्या.नगर प्रसे क्लबने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेऊन त्यांना पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.शिष्टमंडळाचे नेतृत्व मन्सूर शेख यांनी केलं.