काल नगरमध्ये लोकमतच्या वार्ताहराला एका पोलीस अधिकार्याने बेदम मारहाण केली.त्याला सकाळपर्यंत डांबून ठेवले,त्याचा गुन्हा काय तर त्याने आंदोलन काळातील पोलिसी अत्याचाराचे फोटो काढले.या घटनेनं नगरचे सारे पत्रकार संतापले.नगर तालुका पोलीस ठाण्यासमोर सकाळपासून ठिय्या आंदोलन करीत आहेत.एस.पी.मिटिंगमध्ये आहेत.मा.मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घातला पण अजून काही निरोप नाही.संबंधित पोलीस अधिकार्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी आहे.शिवाय चौकशी होईपर्यंत त्याला सक्तीच्या रजेवर पाठवा अशीही मागणी आहे.सारेच डोळ्यावर पट्टी बांधून आहेत.मात्र अशी भूमिका घेऊन चालणार नाही.पोलीस अधिकार्यावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातील पत्रकार रस्त्यावर उतरतील.तेव्हा नवे विषय निर्माण न करता एसपींनी तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा आहे..-