दिल्लीत पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध
महाराष्ट्र वन या वाहिनीचे दिल्ली ब्युरो चीफ अमेय तिरोडकर यांच्यासह राजधानीतील अनेक पत्रकारांवर आज हल्ला केला गेला.अमेय तिरोडकर यांच्या तोंडाला मुका मार लागला असून त्यांना त्यावर उपचार घ्यावे लागले आहेत.
जेएनयु प्रकरणातील आरोपी कन्हय्या कुमार याला आज पटियाला कोर्टात हजर करण्यात आलं.त्यावेळी काही वकिल आणि जेएनयुच्या काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली.त्यावेळी तेथे बातमी कव्हर करण्यासाठी आलेले महाराष्ट्र वनचे अमेय तिरोडकर,आयबीएन सेव्हनचे अमित पांडे,तसेच एनडीटीव्हीच्या पत्रकारास मारहाण झाली.सीएनएन-आयबीएन च्या पत्रकार मीनाक्षी उप्रेती यांनाही धक्काबुक्की केली गेली आहे.या हल्ल्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला आहे.–
(Visited 91 time, 1 visit today)