अनिल महाजन परिषदेचे विभागीय चिटणीस

0
981

बाड जिल्हयातील धारूर येथील पत्रकार अनिल महाजन यांची मराठी पत्रकार परिषदेच्या औरंगाबाद विभागाचे चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी नांदेड येथील बैठकीनंतर महाजन यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली होती.औरंगाबाद विभागाचे सचिवपद गेली सहा महिने रिक्त होते.त्याचा तात्तपुरता कारभार लातूर विभागीय चिटणीस विजय जोशी यांच्याकडे होता.
धारूर तालुका हा मराठवाडयातील दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश म्हणून ओळखला जातो.अनिल महाजन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी धारूर तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून तेथे शिक्षण संस्था सुरू करून या प्रदेशातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध करून दिले आहे.त्याच बरोबर तालुका पत्रकार संघाने मध्यंतरी दुष्काळात श्रमदानातून तलावातील गाळ काढण्याचे महत्वाचे काम केले होते.धारूर तालुका पत्रकार संघाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.सामाजिक जाणीव जपणारा एक पत्रकार म्हणून अनिल महाजन यांची परिसरात ओळख आहे.25 डिसेंबर 2016 रोजी नांदेड येथे राज्यातील तालुका अध्यक्षांचा भव्य मेळावा होत आहे.या पार्श्‍वभूमीवर एका तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील पत्रकाराला विभागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.नांदेड येथील तालुका अध्यक्षांचा मेळावा यशस्वी कऱण्यासाठी अनिल महाजन यांनीही मदत करण्याच्या सूचना त्याना देण्यात आल्या आहेत.परिषदेच्या इतिहासात दुर्गम आणि ग्रामीण भागातील एका तरूण पत्रकाराला प्रथमच प्रतिष्ठेचे पद दिले गेल्याने बीड जिल्हयात आनंद व्यक्त होत आहे..–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here