धरण आणि धबधबा परिसरात जमावबंदी लागू

0
1001
कर्जतमधील धरण आणि धबधबा परिसरात 
तीन महिन्यांसाठी जमावबंद लागू 
कर्जत तालुल्यातील सोलनपाडा धरण आणि आशाने धबधबा  तसेच अन्य धबधबे आणि धरण परिसरात आज पासून तीन महिन्यांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.. कर्जतचे तहसिलदार रवींद्र बाविस्कर यांनी हा आदेश काढल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.सोलनपाडा धरणात काल रात्री तीन तरूणांचा बुडुन मृत्यू झाला होता.त्या अगोदरही आशाने आणि अन्य धबधब्यावर दुर्घटना घडल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून तालुका प्रशासनाने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे.मुंबईच्या जवळ असलेल्या कर्जत परिसरातील धरण आणि धबधब्यांवर शनिवार आणि रविवारी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते ,त्यातील अनेकजण मद्य प्राशन करून गोंधळ घालत असतात त्यातून अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here